ETV Bharat / state

एक लीटरमध्ये दीड एकराची आंतरमशागत, साठ वर्षीय रँचो शेतकऱ्याने बनविले टाकावू पासून टिकावू यंत्र - yavatmal farmers news

सध्या खरीप हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांची पिके काही ठिकाणी आंतरमशागतीला आली आहेत. अतिवृष्टी आणि दुबारपेरणीतून आर्थिक संकटाला सामोरे गेलेला शेतकरी आता आंतरमशागतीच्या कामाला जोमाने लागला आहे.

Yavatmal
यंत्रासह पांडुरंग महादेव ठाकरे
author img

By

Published : Aug 6, 2021, 11:49 AM IST

Updated : Aug 6, 2021, 4:52 PM IST

यवतमाळ - गरज ही शोधाची जननी आहे. शेतकऱ्यांना एकीकडे शेत मालाला भाव मिळत नाही आणि दुसरीकडे उत्पादन खर्च वाढतच चालला आहे. हा उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने शेतकरी सतत प्रयत्नशील असतात. असाच प्रत्यय जिल्ह्यातील राळेगाव येथे आला आहे. येथील पांडुरंग महादेव ठाकरे या साठ वर्षीय जुगाडू रँचो शेतकऱ्याने टाकाऊ वस्तूपासून पिकातील आंतरमशागत करण्यासाठी यंत्राची निर्मिती केली आहे. त्यांनी तयार केलेले हे यंत्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने त्यांच्या या संशोधनाची पंचक्रोशीत चर्चा होत आहे.

एक लीटरमध्ये दीड एकराची आंतरमशागत, साठ वर्षीय रँचो शेतकऱ्याने बनविले टाकावू पासून टिकावू यंत्र
जुन्या साहित्यातून यंत्राची निर्मिती -

सध्या खरीप हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांची पिके काही ठिकाणी आंतरमशागतीला आली आहेत. अतिवृष्टी आणि दुबारपेरणीतून आर्थिक संकटाला सामोरे गेलेला शेतकरी आता आंतरमशागतीच्या कामाला जोमाने लागला आहे. आंतरमशागत करताना माणसांवर,बैल, ट्रॅक्टर किंवा आधुनिक यंत्राच्या सहाय्याने प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे शेतकरी आंतरमशागतीचे काम पूर्ण करुन घेत आहे. अशा परिस्थिती राळेगाव येथील शेतकरी पांडुरंग ठाकरे यांनी आपल्या पिकांची आंतरमशागत करण्यासाठी टाकावू वस्तूपासून आंतर मशातगती यंत्र बनविले आहे. हे यंत्र सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी अत्यंतय उपयुक्त ठरणारे आहे.

एक लीटरमध्ये दीड एकराची मशागत-

या यंत्रासाठी ठाकरे यांनी आपल्याच साई बाबा इंडस्ट्रीज वर्कशॉपमध्ये उपलब्ध साहित्याचा जुगाड उपयोगात आणला आहे. या यंत्रासाठी त्यांनी अॅपेचे इंजिन आणि वर्कशॉप मधील जुन्या साहित्याचा वापर केला आहे. त्यामुळे अत्यल्प कमी खर्चात त्यांनी हे यंत्र बनविले. या यंत्रामुळे एकाचवेळी शेतीचे एक लिटर डिझेलमध्ये तासाभरात दीड एकरात मशागत होते. या शिवाय या यंत्राने डवरणी, वखरणी, नांगरणी, आणि पेरणी सुद्धा करता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांची वेळ व मजुरावरील खर्च वाचत आहे. त्यांच्या या यंत्राने पंचक्रोशीत मोठ्याप्रमाणावर चर्चा सुरू आहे.

Last Updated : Aug 6, 2021, 4:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.