यवतमाळ - शेतात पाण्याची सुविधा असूनही भारनियमनामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देताना अडचणी येतात. रामनगर तांडा येथील एका शेतकऱ्याने या अडचणीवर पर्याय शोधला आहे. हरिसिंग राठोड या शेतकऱ्याने सौर ऊर्जेचा वापर करून ओलिताची शेती केली आहे.
यवतमाळ तालुक्यातील रामनगर तांडा येथील शेतकरी हरिसिंग राठोड यांच्याकडे सात एकर शेती आहे. मात्र, भारनियमनामुळे शेतीत सिंचन करणे अवघड झाले होते. इतर कोरडवाहू शेतकऱ्यांप्रमाणे त्यांचीही आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. अशातच त्यांना महावितरण कंपनीच्या सौर ऊर्जा योजनेची माहिती मिळाली.
हेही वाचा - धैर्याची परीक्षा! वडिलांचा मृतदेह दारात असताना शीतलने दिला दहावीचा इंग्रजीचा पेपर
त्यांनी तत्काळ कागदपत्रे आणि इतर बाबींची पूर्तता केली. त्यानंतर त्यांनी शेतात सौर ऊर्जा संच बसवला, त्यामुळे सिंचनाचा प्रश्न मिटला. हरिसिंग राठोड आता कापूस, भूईमूग, भाजीपाला, गहू ही पीके घेत आहेत. सौर ऊर्जा संच शेतकऱ्यांना संजीवनी देणारा उपक्रम ठरत आहे.