यवतमाळ - वर्षभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडाकेबाज कारवाई केली. अवैध दारू विक्री आणि वाहतुकीच्या प्रकरणात 743 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. उत्पादन शुल्क विभागाने वर्षभरातील कारवायांमधून 91 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मद्य विक्रीतून उत्पादन शुल्क विभागाला 28 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून 1 एप्रिल ते 30 डिसेंबर कालावधीत एकूण 743 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर 568 जणांना अटक करण्यात आली होती.

हेही वाचा-एकनाथ खडसेंच्या चिंतेत पडली भर; पुन्हा कोरोनाची लागण ?
- बनावट दारूचा कारखाना उद्धवस्त करण्यात आला.
- हरियाणा येथून आलेली दारू जप्त करण्यात आली.
- टाळेबंदीच्या कालावधीत नियमभंग करणाऱ्या 20 परवाना धारकांचे परवाने रद्द करण्यात आले. आठ परवाना धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
- वर्षभरात 84 लाख 91 हजार बल्क लिटर देशी दारू, 20 लाख 49 हजार बल्क लिटर विदेशी आणि 11 लाख 45 हजार बल्क लिटर बिअरची विक्री करण्यात आली आहे.वर्षभरातील कारवायांमधून 91 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
वेळेतच दारू दुकाने बंद होतील
कोरोना काळात दारू दुकानांच्या वेळेत बदल झाला आहे. नवीन कोणत्याही प्रकारचे निर्देश आले नाहीत. त्यामुळे वेळेतच दारू दुकाने बंद होतील, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुरेंद्र मनपिया यांनी दिली. देशी, विदेशी दुकाने व बिअर बार यांना दुकाने उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ ठरवून दिली आहे. सकाळी नऊ ते रात्री नऊ अशी दुकानांची वेळ आहे. तर बिअर बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. 31 डिसेंबरलाही हीच वेळ पाळणे बंधनकारक आहे. दरम्यान, राज्यभरात दारुच्या दुकानांची वेळ 31 डिसेंबरला रात्री अकरा वाजेपर्यंत आहे.
हेही वाचा- धार्मिक उन्माद, पाकिस्तानमध्ये जमावाकडून हिंदू मंदिराची नासधूस
नवीन वर्षाच्या पाश्वभूमीवर विभाग अलर्ट
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. त्यासाठी तरुण विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. नवीन वर्षाच्या पाश्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाला दक्षतेच्या सूचना दिल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुरेंद्र मपनिया यांनी सांगितले. कोरोना महामारीचा काळ असल्याने सरकारने नियम आखून दिले आहेत. सामाजिक अंतर पाळणे, मास्क लावणे व हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. नवीन वर्षाच्या पाश्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक सज्ज आहेत. अवैध दारू विक्री होणार नाही, यावर या विभागाचा कटाक्ष राहणार असल्याचे मनपिया यांनी म्हटले आहे.