यवतमाळ - कृषी कार्यालयातील कर्मचार्यास एका आरटीआय कार्यकर्त्याने मारहाण करीत शिवीगाळ केली. तसेच महिला अधिकार्यांशी एकेरी भाषेत हुज्जत घातली. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी दहशतीत आहेत. कृषी विभागात अशा पद्धतीने वागणार्या तसेच सतत तक्रारी करणार्या सुरेशा राजगुरे याच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी कृषी कर्मचार्यांनी जिल्ह्यात कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
राजगुरे शासनाच्या विविध विभागांकडे तक्रारी तसेच माहिती अधिकारांतर्गत केलेल्या अर्जांची संख्या असंख्य आहे. त्यामुळे राजगुरेच्या अर्जांची दखल घेण्यात येऊ नये, कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनात कृषी अधिकारी, संघटना, कृषी पर्यवेक्षक संघटना, ट्रेसर्स असोसिएशन, कृषी साहायक संघटना, राज्य लिपिकवर्गीय कर्मचारी आदींनी पाठिंबा दिला आहे.