यवतमाळ - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक तब्बल 13 वर्षांनंतर जाहीर झाली आहे. मतदानाला आणखी किमान 25 दिवसांचा अवधी असला तरी बँकेचे संचालक आतापासूनच प्रचाराला लागले आहेत. बँकेची निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांनीही जोरदार मोर्चेबांधणी चालविली आहे.
जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालकांची संख्या 28 आहे. परंतु बैद्यनाथन आयोगाच्या निर्देशानुसार ही संचालक संख्या आता 7 ने कमी करून 21 वर आणण्यात आली आहे. संचालकांच्या 21 जागांसाठी 26 मार्चला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून निवडणूक घेतली जात आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या दिवसापासूनच जिल्हा बँकेचे मुख्यालय व विभागीय कार्यालयांमध्ये निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. संचालकांच्या बैठकांवर बैठका होत आहेत.
निवडणुकीत कोणता पक्ष काय भूमिका घेईल, महाविकास आघाडी भूमिका महत्वाची काय अरणार आहे. कोणा-कोणाचे पॅनेल असेल, पॅनलमध्ये कोणकोणत्या उमेदवरांचा समावेश असेल, तालुका गटातून कोण लढणार, जिल्हा गटातून कुणाची नावे, आरक्षणाच्या जागांवर संभाव्य उमेदवार कोण, अशा विविध मुद्यांवर या बैठकांमध्ये चर्चां रंगत आहेत.
13 वर्षांपासून बँकेवर असलेली सत्ता याबाबी सर्वश्रृत असल्याने मतदारही सहजासहजी कुणाला शब्द देण्याच्या तयारीत नाही. संचालकांनी आतापासूनच मतदारांच्या भेटीगाठी, मोबाईलवरून संपर्क करून प्रचाराला सुरुवात केली आहे.
हेही वाचा - तुरीसह कापूस उत्पादकांना मोठा दिलासा; जिल्हा प्रशासन भाड्याने घेणार गोदाम