यवतमाळ - शहरांत खर्रा विक्री बाबत पोलिसांनी धडक कारवाई करीत तब्बल 8 क्विंटल सुपारी जप्त केली आहे. अत्यावश्यक साहित्य म्हणून अन्नधान्याच्या ट्रकमध्ये ह्या सुपारीच्या गोणी चोरून शहरात आणताच पोलिसांनी ही कारवाई केली.
राज्यात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू आणि सुपारीयुक्त खर्रा किती राजरोसपणे विक्री होतो. हाच खर्रा कोरोनावाहक देखील बनला असल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. त्यानंतर जिल्ह्यात खर्रा विक्रेते आणि त्याचे साहित्य विक्रेते पोलिसांच्या रडारवर आले आहे. सुरुवातीला पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला थातुरमातुर कारवाई करणाऱ्या पोलीसांना तंबी दिल्यानंतर यवतमाळ शहरात धडक कारवाई सुरु झाली आहे.
सुपारीसह ट्रक, असा पोलिसांनी 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. छोटी गुजरीतील न्यु हिंन्दुस्थान गुड्स गॅरेजचे गोडाऊनमध्ये पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. त्यामुळे खर्रा विक्रेत्यांसह खर्ऱ्यासाठी लागणारे साहित्य अवैधरित्या विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
पोलिसांनी आरोपी देवानंद शंकर राऊत (रा. जांब रोड, अकोलकर लेआउट), कुणाल नामदेव बुटले (रा.वाघापूर,यवतमाळ) यांच्या विरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आठ क्विंटल सुमारीसह ट्रक (क्र. एम एच 40 वाय 7707) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप सिरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षण मिनल कोयल यांच्या पथकाने केली आहे.
हेही वाचा - यवतमाळात 82 पॉझिटिव्हसह आयसोलेशन वॉर्डात 135 जण भरती; तपासणीकरीता पाठविले 145 नमुने