ETV Bharat / state

Wine Party In Yavatmal फुलसावंगीच्या सबस्टेशनमध्ये भरदुपारी रंगली ओलीपार्टी, उपकार्यकारी अभियंत्याने बनवलेला व्हिडिओ व्हायरल

यवतमाळ जिल्ह्यातील फुलसावंगी येथील सबस्टेशनमध्ये भरदुपारी ओली पार्टी रंगल्याने खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ खुद्द उपकार्यकारी अभियंत्याने बनवला आहे. मात्र हा व्हिडिओ तब्बल एका महिन्यानंतर व्हायरल झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ही ओली पार्टी करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

author img

By

Published : Jan 12, 2023, 3:12 PM IST

Updated : Jan 12, 2023, 3:20 PM IST

Deputy Executive Engineer Makes Wine Party Video
संग्रहित छायाचित्र
फुलसावंगीच्या सबस्टेशनमध्ये भरदुपारी रंगली ओलीपार्टी

यवतमाळ - ३३ केव्ही सब स्टेशनच्या कार्यालयात भर दुपारी दारू पार्टी रंगली. या पार्टीचा उपकार्यकारी अभियंत्याने व्हिडिओ बनवला. मात्र हा व्हिडिओ तब्बल एका महिन्यानंतर व्हायरल झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना फुलसावंगीच्या वीज वितरणच्या कार्यालयात उघडकीस आली. फुलसावंगीच्या कार्यालयावर ४२ गावांचा भार आहे. मात्र या वीज केंद्रातील कार्यालयात भरदुपारी चक्क दारूची ओली पार्टी रंगत असल्याने नागरिकांना धक्काच बसला आहे. दरम्यान ओली पार्टी करणारे दोन कर्मचारी निलंबीत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

फुलसावंगी येथील वीज वितरण कार्यालयातील प्रकार फुलसावंगी येथील ३३ केव्ही सब स्टेशनचे कामकाज अनेक महिन्यापासून प्रभारी अधिकाऱ्यावर आहे. येथे ४२ गावांचा वीज पुरवठा करण्याचा भार असून सुद्धा कर्मचाऱ्यांची अतिशय तोकडी संख्या उपलब्ध आहे. त्यातील अनेक कर्मचारी नियमांना तिलांजली देऊन उपडाऊन करत आहेत. त्यातच जीर्ण झालेल्या वीज तार वारंवार नादुरुस्त होतात. एकंदरीत येथील ३३ केव्ही सबस्टेशन एक ना अनेक समस्यांना तोंड देत आहे. त्यातच सोमवारी दिवसभर समाज माध्यमातून येथील कार्यालयातील मद्यपार्टीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत होता.

बिअर बारला पण लाजवेल असे चित्र फुलसावंगी कार्यालयातील भरदुपारी ऑपरेटरच्या टेबलावर एखाद्या बिअर बारला पण लाजवेल असे चित्र पहावयला मिळाले. त्या टेबलावर नियमित दारू पिणारे जे मसालेदार बॉईल अंड्डे, चकना म्हणून उपयोगी होत असलेली पुडी, बंद खरमुरे व सर्वात महत्वाचे म्हणजे दारूने भरलेला ग्लास असे चित्र त्या टेबलाचे होते. या व्हिडिओतील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व सुरू असतानाच एक तरुणी कर्मचारी दूर एका टेबलावर आपल्या कामात व्यस्त दिसत आहे. त्या संबंधित दारू पार्टी करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलीच्या वयाची मुलगी येथे बसून असल्याचा देखील भान राहिले नाही. हा प्रकार अनेक दिवसापासून की महिन्यापासून सुरू असल्याचा अंदाज लावणे कठीण असले, तरी त्या टेबलावरील सेटप पाहून सर्व साहित्य अनेक वेळ वापरल्या गेल्याचा संशय येतो.

उपकार्यकारी अभियंत्याने बनवला व्हिडिओ मद्यपार्टीचा हा व्हिडिओ खुद्द उपकार्यकारी अभियंत्याने बनवला आहे. १३ डिसेंबरचा हा व्हिडिओ जवळपास एका महिन्यांनी समाज माध्यमातून व्हायरल होताच खळबळ उडाली आहे. तो ऑपरेटर व वीज कर्मचारी नशेच्या स्थितीत काम करत होते. त्यांच्या या व्यसनाधिनतेमुळे मोठी जीवितहानी होऊ शकली असती. या सर्व प्रकरणात प्रभारी सह्यायक अभियंता यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उभे केले जात आहे.

कार्यशैलीवर अनेक सवाल फुलसावंगी येथील सब स्टेशनवर भरदुपारी रंगणारी मद्यपार्टी सहायक अभियंत्यांच्या निदर्शनास कश्या आल्या नाहीत? की त्यांची सुद्धा या पार्ट्यांना मूक सहमती तर नव्हती ना? अशी चर्चा नागरिकांतून केली जात आहे. या प्रकरणात ऑपरेटरसह एका वीज कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे. मात्र या घटनेत दिसत असलेल्या एक कर्मचारी कारवाईच्या कक्षेत का आला नाही, असा सवालही नागरिक करत आहेत. शिवाय सहायक अभियंता यांची सुद्धा या प्रकरणात जवाबदारी निश्चित झाली पाहिजे अशी मागणीही नागरिक करत आहेत. या उघडकीस आलेल्या प्रकरणामुळे ऑनफिल्ड कामावर असलेल्या खुद्द वीज कर्मचाऱ्याच्या जीवाशी कसा खेळ मांडला जात आहे, हे चव्हाट्यावर आले आहे.

दोन कर्मचारी निलंबित करण्यात आले फुलसावंगी येथे हा प्रकार सुरू असल्याचे समजल्यानंतर आधी या कर्मचाऱ्यांना बोलावून तोंडी तंबी देऊन सुद्धा दुपारी दारू पिण्याचा प्रकार सुरूच होता. म्हणून नाईलाजाने व्हिडिओ करण्याची वेळ आली. या प्रकरणात दोन कर्मचारी निलंबित करण्यात आल्याची माहिती महागावचे उप कार्यकारी अभियंता व्ही. व्ही. चव्हाण यांनी दिली.

घटनेबद्दल कोणतीही कल्पना नव्हती व्हिडीओतून समजलेल्या प्रकाराबद्दल कोणतीही पूर्व कल्पना नव्हती. किंबहुना त्या घटनेच्या दिवशी सुद्धा मी सवना येथे सेवा देत होतो, अशी प्रतिक्रिया फुलसावंगीचे प्रभारी सहायक अभियंता गोपाल मुडे यांनी दिली आहे.

Last Updated : Jan 12, 2023, 3:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.