ETV Bharat / state

मारेगाव येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला वणीत; खून झाल्याचा संशय - मारेगाव बेपत्ता तरुणाचा मृतदेह

वाहन परवाना काढण्यासाठी आल्यानंतर बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह नांदेपेरा मार्गावरील रेल्वे रूळाजवळ असलेल्या झुडूपात आढळून आला. योगेश रामभाऊ गहुकर (28, रा. मारेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मृत योगेश
author img

By

Published : Nov 2, 2019, 9:37 PM IST

यवतमाळ - नांदेपेरा मार्गावरील रेल्वे रूळाजवळ असलेल्या झुडूपात तरूणाता मृतदेह आढळून आला. मृत तरूण हा मारेगावचा असून तो वाहन परवाना काढण्यासाठी वणी येथे आल्यानंतर बेपत्ता होता. ही घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली.

योगेश रामभाऊ गहुकर (28, रा. मारेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. योगेशचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. मृत योगेश मारेगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्त्वावर शिकवण्याचे काम करत होता. योगेशने शुक्रवारी वणी येथे वाहन परवाना काढण्यासाठी जात असल्याचे घरी सांगितले होते. योगेश उशीरापर्यंत घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. त्याचा तपास न लागल्याने अखेर मारेगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली.

हेही वाचा - प्रणिती शिदेंविषयी वादग्रस्त वक्तव्य, काँग्रेसची एमआयएमविरोधात तक्रार दाखल

शनिवारी बेपत्ता योगेशचा मृतदेह नांदेपेरा मार्गावर असलेल्या रेल्वे रूळाजवळील झुडूपात आढळला. त्याच्या मानेवर गळा आवळल्याच्या खुना आढळून आल्या आहेत. तसेच त्याच्या दोन्ही पायांची बोटे घासली गेली आहेत. त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी खून करून मृतदेह रेल्वे रूळाजवळ टाकल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली. योगेशच्या मृत्यूबाबत एका महिलेला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Intro:Body:यवतमाळ : वाहन परवाना काढण्यासाठी वणी येथे आलेल्या मारेगाव येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह नांदेपेरा मार्गावरील रेल्वे रूळाजवळ असलेल्या झुडूपात आढळून आला. ही घटना आज सांयकाळ दरम्यान उघडकीस आल्याने खळबळ उडाली. त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. एका महिलेला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
योगेश रामभाऊ गहुकर (28, रा. मारेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा तरुण मारेगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्त्वावर शिकवायचा. योगेशने शुक्रवारी वणी येथे वाहन परवाना काढण्यासाठी जात असल्याचे घरी सांगितले होते. दुचाकीने वणीत पोहोचला. मात्र, उशीरापर्यंत घरी न परतल्याने नातेवाइकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. कुठेही शोध न लागल्याने अखेर मारेगाव पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली. आज योगेशचा मृतदेह नांदेपेरा मार्गावर असलेल्या रेल्वे रूळाजवळील झुडूपात आढळला. त्याच्या मानेवर गळा आवळल्याच्या खुना आढळून आल्या आहे. त्याच्या दोन्ही पायाची बोटे घासल्या गेली आहे. दुसर्‍या ठिकाणी खून करून मृतदेह रेल्वे रूळाजवळ टाकल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली. या घटनेमुळे मारेगाव व वणी शहरात विविध चर्चाना उधाण आले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.