ETV Bharat / state

दगड बांधून नवजात अर्भक फेकले तलावात.. उमरखेड तालुक्यातील निंगणूर येथील घटना - नवजात अर्भक यवतमाळ बातमी

तलावाकाठी गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका गुराख्याला हे अर्भक आढळून आले. दगडाला दोरीने बांधलेल्या अवस्थेतील ह्या मृत अर्भकाविषयी गुराख्याने पोलीस पाटलांमार्फत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीसांनी घटनस्थळ गाठून पंचनामा केला.

dead-body-of-baby-found-in-lake-in-yavatmal
दगड बांधून नवजात अर्भक फेकले तलावात..
author img

By

Published : Feb 25, 2020, 11:11 AM IST

यवतमाळ- जिल्ह्यातील निंगणूर येथे नवजात अर्भक तलावात फेकून माता पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उमरखेड तालुक्यातील निंगणूर पाझर तलावात एका निर्दयी मातेने नवजात अर्भक दगडाला बांधून फेकून दिले आहे. मात्र, हे अर्भक दूरवर न फेकले गेल्याने ते पाण्यावर तरंगत राहिले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दगड बांधून नवजात अर्भक फेकले तलावात..

हेही वाचा- पंतप्रधान मोदी हे 'वाटाघाटीत कठोर' असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले; यामागचा नेमका अर्थ काय?

तलावाकाठी गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका गुराख्याला हे अर्भक आढळून आले. दगडाला दोरीने बांधलेल्या अवस्थेतील ह्या मृत अर्भकाविषयी गुराख्याने पोलीस पाटलांमार्फत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीसांनी घटनस्थळ गाठून पंचनामा केला. दरम्यान, निंगणूर परिसरातील गावकऱ्यांनी तलावाकाठी मोठी गर्दी केली होती. हे नवजात बाळ कुणाचे, त्याला कुणी एवढ्या क्रूरतेने फेकले, याचा तपास उमरखेड पोलीस करीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.