ETV Bharat / state

माळ पठारावर फुलविले नंदनवन; पडीक जमिनीवर शेतकऱ्याच्या जिद्दीतून उगवली समृद्धीची नवी पहाट - Custard apple farming ner

नेर तालुक्यातील लोहतवाडी येथील निवृत्ती भेंडे या शेतकऱ्याने कित्येक वर्षापासून पडीक असलेल्या आणि माळरानावरील शेतात सीताफळाची बाग फुलवून त्याचे नंदनवन बनविले आहे.

pic
छायाचित्र
author img

By

Published : Nov 7, 2020, 4:49 AM IST

यवतमाळ : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात आत्महत्या होत आहेत. मात्र, याच जिल्ह्यात जिद्दीच्या जोरावर शेतात समृद्धीची नवी पहाट शोधणारे प्रयोगशील शेतकरी सुद्धा आहे. कित्येक वर्षापासून पडीक असलेल्या आणि माळरानावरील शेतात सीताफळाची बाग फुलवून त्याचे नंदनवन बनविले आहे. नेर तालुक्यातील लोहतवाडी येथील निवृत्ती भेंडे असे या 65 वार्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. ज्या वयात लोक निवृत्त होतात, त्या वयात शेतीचा कुठलाही गंध नसताना जिद्दीने फळबाग तयार करण्यास सुरुवात केली.

माळरानावर फळबाग उभी करणारा शेतकरी

पडीक जमीन केली लागवडी योग्य

छायाचित्र
छायाचित्र
वडिलोपार्जित असलेली सात एकर शेत जमीन निवृत्ती बेंडे यांना आहे. यातील दोन एकर शेती ही माळरानावर आहे. गेल्या शंभर वर्षापासून ही पडीक पडली होती. यात माती कमी अन् दगडधोंडे जास्त. त्यामुळेच शेती करण्यास आतापर्यंत कुणी हिंम्मत केली नाही. या जमिनीवर आपण काहीतरी केले पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी स्वतः या पठारावरील दगडधोंडे वेचत मशागत करून जमीन लागवडीयोग्य बनवली. नेर येथील एका नर्सरी चालकाने या जमिनीवर सिताफळ लागवड करण्यास प्रोत्साहीत केले. येथूनच 65 वर्षीय भेंडे यांच्यामध्ये तरूणाप्रमाणे नवीन उत्साह संचारला.
छायाचित्र
छायाचित्र
सहाशे सीताफळाची केली लागवडदोन एकर शेतामध्ये सीताफळाची 15 बाय 5 अशी लागवड केली. सुरुवातीला प्रत्येक झाडांना बादलीने पाणी घातले. पोटच्या पोराप्रमाणे त्याची जोपासना केली. संपूर्ण बाग सेंद्रिय आहे. आज सीताफळाची बाग मोठ्या दिमाखात उभी आहे. एक सिताफळ चारशे ते नऊशे ग्रॅम वजनाचे निघत आहे. एका झाडापासून जवळपास एक हजारांचे सिताफळ त्यांना येईल यातून सहा लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
छायाचित्र
छायाचित्र
शेतीचा गंधही नाहीआतापर्यंत निवृत्ती भेंडे प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय करत होते. मुलगा मोठा झाल्यानंतर हा व्यवसाय तो बघू लागला. वडिलांनी घरी आता आराम करावा असे मुलाला वाटत होते. शेती करणे हे परवडणारी नसल्याने त्याने सुरुवातीला विरोध केला. मात्र त्यांनी जिद्दीने आणि मेहनतीने माळ पठारावर सीताफळाची बाग फुलवली. नेर तालुक्यातील इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.