ETV Bharat / state

Corruption In Road Work : वाकान-पोखरी-माळहिवरा रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार, तरुणाने केली कंत्राटदाराची पोलखोल

पुसद विधानसभा मतदार संघातील ( Pusad Assembly Constituency ) वाकान-पोखरी-माळहिवरा या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. नऊ किलोमीटर रस्त्याच्या कामात अडीच कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अविनाश राठोड याने केला आहे. त्याबाबत त्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

Corruption In Road Work
वाकान-पोखरी-माळहिवरा रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार, तरुणाने केली कंत्राटदाराची पोलखोल
author img

By

Published : Jan 9, 2022, 12:56 PM IST

यवतमाळ - पुसद विधानसभा मतदार ( Pusad Assembly Constituency ) संघातील वाकान-पोखरी-माळहिवरा ( wakan Pokhari Malhivra Road ) या नऊ किलोमीटर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे समोर ( wakan Pokhari Malhivra Road Corruption ) आले आहे. काम झाल्यानंतर आठवड्याभरातच हा डांबर रोड उखडून चालला आहे. याबाबत वाकान येथील अविनाश राठोड याने या रस्त्याच्या कामाची पोलखोल उघड केली असून, जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधित कंत्राटदाराची तक्रार केली आहे.

पुसद विधानसभा मतदारसंघातील पाखरी माळहिवरा वाकान रस्त्यासाठी अडीच कोटीचा निधी मंजूर झाला. त्यातून या 9 किलोमीटरचा रस्ताही तयार करण्यात आला. मात्र या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने दुसऱ्या दिवशी पासूनच हा रस्ता उखडण्यास सुरुवात झाली. रस्त्याचे काम अधीक्षक अभियंता संबंधित अभियंते व इतर राजकीय पदाधिकारी यांच्यामुळे हे काम या कंत्राटदाराला मिळाल्याचे बोलले जात आहे.

यासंदर्भात बोलताना स्थानिक नागरिक अविनाश राठोड म्हणाले की, ज्या रस्त्यासाठी वीसवर्षापासून वाट पाहत होतो. तो रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झाला. यानंतर आता दहा वर्षे हा रस्ता होणार नाही. त्यामुळे शासनाच्या पैशाचा अपव्यय हे अभियंता व कंत्राटदार करीत असल्याने सर्वांची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

वाकान-पोखरी-माळहिवरा रस्त्याच्या कामाची पोलखोल करताना तरुण

या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात यावे. संबंधित कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनिष जाधव यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे ( Collector Amol Yedage ) यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा - Bus-Truck Accident : बस-ट्रकच्या भीषण अपघातात सहा ठार; अंबाजोगाईजवळील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.