यवतमाळ - भारत हा सर्वाधिक कापूस उत्पादक देश आहे. त्यात महाराष्ट्रमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन केले जाते. यवतमाळची 'कॉटन सिटी' म्हणूनच एक वेगळी ओळख आहे. कोरडवाहू शेतकरी नगदी पीक म्हणून कपाशीची लागवड करतात. जिल्ह्यात सुमारे 4 लाख 80 हजार हेक्टरवर कापसाची लागवड केली. यातून 30 लाख क्विंटल कापसाचे उत्पादन जिल्ह्यात होते. मात्र, अवकाळी पाऊस आणि आता कोरोनामुळे कापसाचे भाव पडले आहेत.
हेही वाचा... COVID-19 : इराणमधील भारतीयांना आणण्यासाठी तीन विमाने जाणार..
या कापसाची चीन, बांगलादेश व इतर देशामध्ये निर्यात केली जाते. मात्र, कोरोनामुळे कापूस निर्यात केला जात नाही. परदेशात कापूस निर्यात होत नसल्याने याचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. त्यामुळे कापसाला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे. सध्या 4850 पर्यंत कापसाचा भाव असून आंतराष्ट्रीय मागणी नसल्याने कापसाला भाव मिळत नसल्याचे सांगत आहे.
हेही वाचा... कोरोनाची दहशत : हिंगोलीत 21 हजार कोंबड्या जिवंत पुरल्या, शेतकरी हतबल
कापूस विकायला आणला तर भाडे आणि सगळे हिशोब पाहता भाव हा न पुरणारा आहे, असे शेतकरी सांगतात. कोरोनाचा मोठा परिणाम जो आहे तो कापूस उत्पादनवर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाणारा कापूस हा कोरोना व्हायरसमुळे थांबला असून या कापसाचा मोठा खरीददार हा चीन आहे. भारतातून मोठ्या प्रमाणात कापूस चीनला निर्यात केला जात होता. मात्र, कोरोना व्हायरसमुळे तो थांबवला आहे. त्यामुळे सध्या कापसाचे 4900 चे भाव आहेत. जवळपास 40 ते 45 लाख गाठींची दरवर्षी निर्यात दरवर्षी केली जाते. मात्र, कोरोनामुळे सध्या 8 ते 10 लाख गाठीवर विक्री केले जात आहे. त्यामुळे कापूसचा भाव कमी झाला आहे. याचा फटका शेतकरी व्यापारी, जिनिंग व्यवसायला बसला आहे.
मागील वर्षी 6000 प्रति क्विंटलवर कापसाचा भाव गेला होता. मात्र, यावेळेस मागणी नसल्याने भाव नसल्याने याचा फटका बसतो आहे. असे व्यापारी आणि जिनिंग चालक सांगतात. कोरोनामुळे परदेशात कापूस जात नाही. चीनमध्ये कापसाच्या गाठी गेल्या आहेत. तर तीन शिफ्टमध्ये काम करन चीनने तयार केलेले रेडिमेड कापड जगभरात जात होते. मात्र, कोरोनामुळे माल आयात-निर्यात होत नाही. त्यामुळे कापसाला आणि गाठीला मागणी नाही.
हेही वाचा... घाबरून जाऊ नका, मात्र खबरदारी घ्या; पंतप्रधानांचा देशवासियांना सल्ला