यवतमाळ - दिवसागणिक जिल्ह्यात कोरोनाची दाहकता वाढत आहे. दिवसाला हजाराच्यावर पॉझिटिव्ह बाधित रुग्ण निघत आहेत. तर दुसरीकडे रोज 20 ते 25 रुग्णांचा मृत्यू होत आहे. जिल्ह्यातील खासगी कोव्हिड हॉस्पिटल व जिल्हा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी रुग्णालय हे बाधितांच्या उपचारासाठी फुल आहेत. तसेच मोक्षधामही अंत्यसंस्कारासाठी फुल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
उपचारासाठी रूग्णांना तर वेटिंगवर राहावे लागते. मात्र आता सरणावर जाण्यासाठीही मृतदेहाला वेटिंगवर राहण्याची वेळ या कोरोना परिस्थितीने आणून ठेवली आहेत. आज एकाच दिवशी पांढरकवडारोड वरील हिंदू स्मशानभूमीत 27 कोरोना बाधित्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.
आतापर्यंत जिल्ह्यात 802 मृत्यू-
एका ओठ्यावरती तीन अंत्यसंस्कार-
पांढरकवडा रोडवरील हिंदू स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी शेड उभारण्यात आली आहेत. यातील तीन शेड हे सामान्य नागरिकांसाठी खुले असून तीन शेड कोरोना बाधित रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येत आहेत. पण मृत्यूची संख्या पाहता एका शेडमध्ये तीन व खाली मोकळ्या जागेतही बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
हेही वाचा- शिवभोजन थाळीने राज्यात शुक्रवारी दुपारपर्यंत 1 लाख 95 हजार लोकांची भागवली भूक