यवतमाळ - गेल्या 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण जास्त आहे. जिल्ह्यात 118 जण कोरोनाबाधित तर 330 जण कोरोनामुक्त झाले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. यातील दोन मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, तीन मृत्यू डीसीएचसी तर दोन मृत्यू खाजगी रुग्णालयातील आहे.
4841 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
शुक्रवारी (आज) एकूण 4959 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 118 जण नव्याने बाधित आले, तर 4841 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2041 रुग्ण ॲक्टिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 867 तर गृह विलगीकरणात 1174 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण बाधित रुग्णांची संख्या 71544 झाली आहे. 24 तासात 330 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 67750 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1753 मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 8 हजार 142 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 34 हजार 584 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर 11.76 असून दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 2.38 आहे, तर मृत्यूदर 2.45 आहे.
रुग्णालयात 1809 बेड उपलब्ध
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 11 डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि 34 खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 470 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1809 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 116 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 461 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 124 रुग्णांसाठी उपयोगात, 402 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोविड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 230 उपयोगात तर 946 बेड शिल्लक आहेत.
हेही वाचा-'एका वर्षात 1 हजार अॅलोपॅथी डॉक्टरांना आयुर्वेदात रुपांतरीत करेन'