ETV Bharat / state

दिलासादायक...! यवतमाळमध्ये सलग दुसर्या दिवशी एकही कोरोनाबाधित आढळला नाही - Yawatmal corona update

यवतमाळ जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही कोरोनाबाधितांच्या संख्येत कोणतीही वाढ झाली नाही. त्यामुळे सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 41 आहे. तर येथे एकूण 49 जण भरती आहेत. यात आठ केसेस प्रिझमटिव्ह आहे.

Yawatmal corona update
यवतमाळ कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 6, 2020, 8:58 PM IST

यवतमाळ - वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्ह्यातील विविध संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती असलेल्या 25 जणांचा निगेटिव्ह आले आहे. हा अहवाल वैद्यकीय महाविद्यालयाला शनिवारी प्राप्त झाले.

निगेटिव्ह आलेल्या अहवालात नर्सिंग स्टॉफमधील पॉझेटिव्ह महिलेच्या निकटच्या संपर्कातील (हाय रिस्क काँटॅक्ट) 20 जण, महागाव येथील कोरोनाबाधित मृताच्या निकटच्या संपर्कातील तीन जण, एक सारीचा रुग्ण आणि एका प्रिझमटिव्ह केसचा समावेश आहे.

जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशीही कोरोनाबाधितांच्या संख्येत कोणतीही वाढ झाली नाही. त्यामुळे सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 41 आहे. तर येथे एकूण 49 जण भरती आहेत. यात आठ केसेस प्रिझमटिव्ह आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शनिवारी 89 नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविले. सुरुवातीपासून आतापर्यंत महाविद्यालयाने 2358 नमुने पाठविले आहेत. यापैकी 2270 रिपोर्ट प्राप्त तर 88 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात 2116 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

जिल्ह्यात सुरवातीपासून पॉझेटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा 154 पर्यंत पोहचला आहे. यापैकी 111 जण बरे होऊन घरी गेले आहे. तर सद्यस्थितीत 41 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती आहेत. तसेच दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.