यवतमाळ - जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हेंसह १२ जणांनी तत्कालीन भूमिअभिलेख उपअधीक्षक, सहायक दुय्यम निबंधक यांच्या सहाय्याने जमिनीची खोटी कागदपत्रे तयार केली होती. ती कागदपत्रे पालकमंत्री मदन येरावार, अमित चोखानी यांना हस्तांतरित केली. या प्रकरणी पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह १६ जणांविरुद्ध ४२० ,४२६, ४६५ ,४६८, ४७१ r/w३४ आणि १२० ब नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश यवतमाळ प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी यांनी दिले आहेत.
या प्रकरणी आयुषी किरण देशमुख यांनी न्यायालयात धाव घेतली होती. आज त्यावर न्यायालयाने निकाल देत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात यवतमाळ मधील प्रतिष्ठित भाजप जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे, जयश्री ठाकरे, विजयश्री कारेकर, जयंत कोल्हे, राजश्री संजय देवतळे, तेजश्री थुटे, दिलीप कोल्हे, अर्चना कोल्हे, आशिष कोल्हे, वैशाली कोल्हे, अमोल कोल्हे, शीतल धोटे, पालकमंत्री मदन येरावार, अमित चोखानी, तत्कालीन भूमिअभिलेख अधिकारी, तत्कालीन नगर परिषद सिओ, आदींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.