यवतमाळ - कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी कळंब तालुक्यातील चापर्डा येथील कोविड केअर सेंटरला आकस्मिक भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला.
यावेळी जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्यांवर भर द्या. पूर्व व्याधींनी ग्रस्त असलेल्या प्रत्येक व्यक्तिची वेळत तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. लक्षणे असलेल्या रुग्णांची तत्काळ तपासणी करून वेळेत उपचार उपलब्ध करून द्यावा. ग्रामस्तरीय समितीमार्फत रोज सर्वेक्षण करावे. सर्वेक्षणातून लक्षणे असलेल्या नागरिकांची माहिती तत्काळ आरोग्य विभागास द्या, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी त्यांनी कोरोनाबाबत करण्यात आलेल्या उपाययोजना, प्रतिबंधित क्षेत्रातील तसेच कोव्हीड केअर सेंटरमधील सोयीसुविधा, तपासण्या, संपर्कातील व्यक्तींचा शोध आदींचा आढावा घेतला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, जिल्हा शल्य चिकिसक डॉ. तरंगतुषार वारे, कोव्हीड केअर सेंटरचे प्रमुख डॉ. प्रणय पेंदोर, डॉ. शैलेश चव्हाण, ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. रवी पाटील उपस्थित होते.
हेही वाचा - यवतमाळ: जिल्ह्यात २४ तासात ५ रुग्णांचा मृत्यू, २५८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद