यवतमाळ - राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. आता त्यांना सभागृहाचे सदस्य व्हावे लागणार आहे. त्यांनी यवतमाळ विधान परिषदेतून निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी करत आहे.
यवतमाळ विधानपरिषदेचे सदस्य तानाजी सावंत हे नोव्हेंबर 2016 ला विधानपरिषद निवडणुकीत विजयी झाले होते. त्यामुळे विधानपरिषदेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवल्यास ते विजयी होतीलच, असा आशावाद व्यक्त होत आहे.
हेही वाचा - 'सेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून केला होता नवस तो आज फेडला'
याविषयी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे म्हणाले, शिवसेनेचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. त्याचा अत्यानंद शिवसैनिक म्हणून आम्हाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांप्रति संवेदनशील आहेत. यवतमाळ शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्हा आहे. त्यामुळे त्यांनी येथून निवडणूक लढवावी, अशी आमची मागणी आहे. याबाबतचा निर्णय आमचे वरीष्ठ नेते घेतील"