ETV Bharat / state

अखेर सूरजला मिळाला न्याय; भांबोरा येथील मुख्याध्यापक निलंबित - principal

या प्रकरणात मनसेने आंदोलनाचा इशारा देत प्रशासनाला धारेवर धरले. पोलीस अधीक्षक यांनी तत्काळ संबंधित ठाणेदार घाटंजी याना या प्रकरणात ज्युवेनाइल कायदा (बाल न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियमानुसार घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

उपोषणाला बसेलेले सुरज आणि त्याचे आईवडील
author img

By

Published : Mar 17, 2019, 1:18 PM IST

यवतमाळ - भांबोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील इयत्ता ४ थी इयत्तेमधील विद्यार्थी सुरज युवराज राठोड याला मुख्याध्यापक अशोक मोहूर्ले यांनी बेदम मारहाण केली होती. यानंतर २५ फेब्रुवारीपासून सुरजच्या आईवडिलांनी सुरजसह आमरण उपोषणाला बसले होते. अखेर मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मुख्याध्यापक अशोक मोहूर्ले याच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात आले.

उपोषणाला बसेलेले सुरज आणि त्याचे आईवडील

सुरजाला मारहाण झाल्यानंतर पालकांनी तक्रार देऊनही मुख्याध्यापकावर प्रशासनाकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नव्हती. आपल्याला न्याय मिळत नाही हे पाहून या मुलांच्या पालकांनी मनसेचे अनिल हमदापुरे यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतली. या प्रकरणात मनसेने आंदोलनाचा इशारा देत प्रशासनाला धारेवर धरले. पोलीस अधीक्षक यांनी तत्काळ संबंधित ठाणेदार घाटंजी याना या प्रकरणात ज्युवेनाइल कायदा (बाल न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियमानुसार घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, गुन्हा दाखल होऊनही शिक्षण विभाग त्या मुख्याध्यापकाला वाचविण्याचे प्रयत्न करत होते.

याबाबत मनसेने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. जिल्हाधिकारी यांनी तत्काळ कार्यवाही करण्यातचे निर्देश जिल्हा परिषदेला दिले. परंतु, एवढे होऊनही प्राथमिक शिक्षण विभाग कुठलीच कारवाई करण्यास तयार नव्हता. मनसेने शिक्षण विभागाविरोधात आक्रमक भूमिका घेताच यांनी या प्रकरणाची फाईल तयारी केली. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाचे आदेश काढले. गेल्या १९ दिवसापासून सुरू असलेले उपोषण मनसेच्या आक्रमक पवित्र्यामुळे आम्हाला न्याय मिळाला, असे उपोषणकर्त्यांनी सांगितले.

Intro:अखेर सूरजला १९ दिवसानंतर मिळाला न्याय
भांबोरा येथील मुख्याध्यापक निलंबित Body:यवतमाळ :- जि.प प्राथमिक मराठी शाळा भांबोरा येथील इयत्ता ४ थी मधील विद्यार्थी सुरज युवराज राठोड याला तेथील मुख्याध्यापक अशोक मोहूर्ले यांनी बेदम मारहाण केली होती. या त्यामुळे २५ फेब्रुवारीपासून मुलासह आईवडील आमरण उपोषणाला बसले होते. अखेर मुख्याध्यापक अशोक मोहूर्ले याच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात आले.
पालकांनी तक्रार देऊनही त्यांच्यावर कुठलीच कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात आली नव्हती. आपल्याला न्याय मिळत नाही हे पाहून या मुलांच्या पालकांनी मनसेचे अनिल हमदापुरे यांच्या कडे न्याय मिळवून देण्यासाठी धाव घेतली. या प्रकरणात मनसेने आंदोलनाचा इशारा देत प्रशासनाला धारेवर धरले. त्यानुसार पोलिस अधीक्षक यांनी तात्काळ संबंधित ठाणेदार घाटंजी याना या प्रकरणात भा. द. वि.(१८६०)कलम ३२३,५०६ तसेच जुविलीयन ऍक्ट (बाल न्याय(मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम२०१५ नुसार कलम २३,७५ अन्वये गुन्हा घाटंजी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.परंतु गुन्हा दाखल होऊनही शिक्षण विभाग त्या मुख्याध्यापकला वाचविण्याचे पूर्ण प्रयत्न करत होता. मनसेने या विषयावर जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.
जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कार्यवाही करण्यातचे निर्देश जि. प. ला दिले. परंतु एवढे होऊनही प्राथमिक शिक्षण विभाग कुठलीच कार्यवाही करण्यास तयार नव्हता. मनसेने शिक्षण विभागा विरोधात आक्रमक भूमिका घेताच यांनी सदर प्रकरणाची फाईल तयारी केली. त्यानुसार मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाचे आदेश काढले.
गेल्या १९ दिवसापासून सुरू असलेले उपोषण मनसेच्या आक्रमक पवित्र्यामुळे वठणीवर आले आणि आम्हाला न्याय मिळाला असे भावना उपोषण कर्त्यांनी व्यक्त केली.
.................
गुरूजी..... मला का मारलं?
नववर्षाच्या बालकाचे आई-वडिलांसह उपोषण

7 मार्च वेळ- 5.30 pm
ला पाठविलेले विजवल वापरावे Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.