ETV Bharat / state

'...तर राज्य सरकारवर केंद्र कारवाई करेल' - भाजप नेते सुधीर मुनगंटीवार

एनआयएच्या कारवाईला राज्य सरकार पाठीशी घालू शकत नाही. राज्य सरकारने असे केल्यास केंद्राकडून राज्य सरकारवर कारवाई करण्याची तरतुद घटनेत आहे, असे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Sudhir Mungantiwar
सुधीर मुनगंटीवार
author img

By

Published : Jan 28, 2020, 5:21 PM IST

यवतमाळ - कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास सध्या केंद्रीय एनआयए या तपास संस्थेकडे आहे. या संस्थेच्या कारवाईला राज्य सरकार पाठीशी घालू शकत नाही. राज्य सरकारने असे केल्यास राज्यावर कारवाई करण्याची तरतूद राज्यघटनेत आहे. त्या अनुसार केंद्र राज्यावर कारवाई करू शकेल, अशी माहिती भाजप नेते तथा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा.... महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी - चंद्रकांत पाटील

एनआयएसाठी जो कायदा केंद्राने केला आहे, त्यात राज्य सरकारची कोणतीही परवानगी लागत नाही. त्यामुळे कोरेगाव-भीमा प्रकरणाची चौकशी आता एनआयए ही तपास संस्था करणार आहे. त्याला संविधानाच्या अधिन राहून मदत करणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. जर राज्य सरकार त्याला आव्हान देत असेल. तसेच कायद्याच्या तरतुदीचे पालन करण्यामध्ये कसूर करत असेल तर अशा राज्य सरकारबाबत काय केले पाहिजे, याचीही तरतूद राज्यघटनेत आहे. त्या तरतुदीनुसार केंद्र सरकार राज्यावर कारवाई करत असते. राज्यपाल महोदय हे देखील राज्यात काय सुरू आहे, याची माहिती राष्ट्रपतींना देऊ शकतात आणि त्यानुसार पुढील कारवाई केली जाते, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

हेही वाचा... कोरेगाव-भीमा प्रकरण : 'सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचा केंद्र सरकारला अधिकार'

Intro:Body:यवतमाळ : एनआईएच्या कारवाईला राज्य सरकार पाठीशी घालू शकता नाही, असे केल्यास राज्य सरकारवर कारवाईची तरतूद आहे, अशी माहिती भाजप नेते तथा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

जो एनआयएचा कायदा केला. त्यात राज्य सरकारची कोणतीही परवानगी लागत नाही, अशी तरतूद आहे. कोरेगाव भीमाची चौकशी एनआयए ही तपास संस्था करणार आहे. त्याला संविधानाच्या अधीन राहून मदत करणे राज्य सरकारची जबाबदारी आहे.जर राज्यसरकार याला आव्हान देत असेल कायद्याच्या तरतुदीच पालन करण्यामध्ये सहकार्य करत नसेल तर अशा राज्य सरकारबाबत काय केलं पाहिजे,याची तरतूद केली आहे त्या तरतुदी केंद्र सरकार कारवाई करत असते. राज्यपाल महोदय राज्यात काय सुरू आहे. याची माहिती राष्ट्रपतींना देऊ शकतात आणि त्यानुसार पुढील कारवाई केली जाते, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

बाईट- सुधीर मुनगंटीवार, भाजप नेतेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.