यवतमाळ - देशातील काही राज्यात कडाक्याची थंडी पडत आहे. असतच इतर देशातून स्थलांतरित होत असलेल्या पक्ष्यांचा मृत्यू हा फ्ल्यूमुळे होत आहे. त्यामुळे देशात पुन्हा बर्ड फ्लू आलाय का, असा प्रश्न समोर येत आहे. मात्र योग्य काळजी व व्हॅक्सिनेशन केल्यास कुठलाच धोका नाही. राज्यात काय देशात बर्डफ्ल्यूचा शिरकावही झाला नाही, असे यवतमाळातील काही पोल्ट्री व्यावसायिकांनी सांगितले.
नेहमी पसरवल्या जातात अफवा
पोल्ट्री व्यावसायिक यांनी बर्ड फ्ल्यूबाबत नेहमी अफवा तयार होते. ती पसरविली जाते, त्यामुळे छोट्या व्यवसायिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे कमी दरात लहान व्यावसायिकांना कोंबड्याची विक्री करावी लागते. बर्ड फ्लूचा संसर्ग माणसाला झाला असता तर आधी आम्ही आणि आमच्यासोबत काम करणाऱ्या मजुरांना हा आजार होऊन मृत्यू झाला असता. मात्र 2003पासून कुठलाच धोका निर्माण झाला नाही.
नियमित स्वच्छता आणि लसीकरण
कुठलाही पोल्ट्रीफार्म व्यावसायिक आपल्या कोंबड्याची विशेष काळजी घेत असतो. स्वच्छता वेळोवेळो लसीकरण पक्ष्यांचे करण्यात येते. त्यामुळे बर्ड फ्ल्यू नाही आणि त्याचा कुठलाच धोका नाही. त्याचप्रमाणे चिकन, अंडे हे उकळून खाल्ले जातात. चिकन 300 डिग्री तर अंडे 100 डिग्रीपर्यंत तापमानात उकळले जाते. त्यात कुठलाही बॅक्टेरिया राहत नाही. त्यामुळे बर्ड फ्ल्यूचा धोका नाही, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.