यवतमाळ - शहरालगत असलेल्या भोयर ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक मनमानी कारभार करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तणावपूर्ण परिस्थितीमुळे येथील ग्रामसभा पोलीस बंदोबस्तात पार पडली. इतकेच नव्हे तर १ हजार लोकसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीमधील अनेक योजनेत गैरव्यवहार असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी थेट पालकमंत्री मदन येरावार यांची भेट घेऊन ग्रामसेवकाला काढून टाकण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - ...तर मराठवाड्याकडे पाणी वळविण्यास आमचा विरोध - सुनील तटकरे
ग्रामसभा वेळेवर घेण्यात येत नसून या संदर्भात विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. तसेच महत्त्वाचे ठराव स्वत:च्या मनाने घेतले जात असून सभेला कोणालाही बोलवले जात नाही. अशा प्रकारे शासनाच्या विविध योजनांबाबत कोणालाही माहितीदेखील दिली जात नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या ग्रामसेवकाला तातडीने बरखास्त करण्यात यावे, त्याजागी योग्य असलेल्या ग्रामसेवकाला नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी विजय देवणारे, विकास खडके, रमेश बोरकर, सुरज मेश्राम, शंकर शिंदे, यशवंत शिंदे, मारोती वट्टी, तुळशीराम मलांडे, अमित शिंदे, दिपाली गुंजाळे, राजेश कुमरे, लीला राऊत, विजय कसारे, कुनती राठोड, सागर शिंदे, सदानंद पेंदोर, विजय दिनारे, अक्षय वाघादे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत
यवतमाळ शहरालगत असलेल्या या भोयर ग्रामपंचायतीमध्ये औद्योगिक वसाहतीचा भाग येतो. या औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास १६० च्या वर मोठे आणि लघुउद्योग सुरू आहेत. या कंपन्यांकडून येणारा निधी मात्र गैरव्यवहारामध्येच जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा विकास होण्याऐवजी अधिकारी आणि सचिव यांचा विकास झाल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे.
हेही वाचा - 'माझ्या सर्जा रं...माझ्या राजा रं...' बैलपोळ्यानिमित्त बघा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट
हेही वाचा - सणाच्या तोंडावर कांद्याची आवक कमी; दिल्लीत कांद्याचे दर दुप्पट