यवतमाळ - भाजपचे सुमित बाजोरिया आणि माजी आमदार विजया धोटे यांच्यात घरालगत असलेल्या जागेच्या ताब्यावरून वाद चांगलाच उफाळला आहे. या वादात विजया धोटे यांनी घरात तोडफोड केल्याची तक्रार दाखल केली. तर बाजोरिया यांनी साहित्याची नासधूस करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. गुरूवारी दोघांनीही पत्रकार परिषद घेत आपली भूमिका विषद केली. जिल्ह्यातील दोन राजकीय मोठे कुटुंब एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
धोटे यांच्या घराची केली तोडफोड दिवंगत नेते जांबुवंतराव धोटे यांच्या निवासस्थानी तोडफोड केली होती. तसेच माजी आमदार विजया धोटे यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजप नेते सुमित बाजोरिया आणि जयस्वाल यांच्याविरुद्ध बुधवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहे. तर माजी आमदार विजया धोटे, ज्वाला धोटे, सागर राऊत यांचे विरुद्ध सुमित बाजोरिया यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. सदर प्रकार हा जांबुवंतराव धोटे यांच्या घराजवळच्या जागेवर ताबा घेण्याच्या वादारून हा प्रकार घडला होता.
गुरूवारी नेताजी व्यापार मार्केट बंद
या प्रकरणाचे पडसाद आज दुसऱ्या दिवशीही शहरात उमटले. घटनेच्या निषेधार्थ नेताजी व्यापार मार्केट बंद ठेवण्यात आले. तर धोटे समर्थकांनी नेताजी भवन येथून पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात सत्याग्रह करण्यात आला. धोटे यांच्या ताब्यात असलेली जागा खरेदी केल्याचा दावा करत सुमित बाजोरिया यांनी तेथे नामफलक व कुंपण लावून ताबा घेण्याचा प्रकारही घडला. शहरात भूमाफियांनी गोंधळ घातला असून यामुळे पोलीस व राजकीय लोकांना अभय मिळत आहे. बाजोरिया यांचे आरोप तथ्यहीन सुमित बाजोरिया यांनी केलेले आरोप व तक्रार तथ्यहीन असल्याचे सांगत मी रीतसर जागा जून 2021 ला सेंच्युरी एम्पेक्स प्रा. ली. मुंबई यांच्याकडून खरेदी केली आहे. त्याची निबंधक कार्यालयात रजिस्ट्री केली आहे.पोलीस संरक्षण शिवाय तहसील, भूमिअभिलेखच्या कर्मचाऱ्या समक्ष घटना झाली आहे. असा कोणताही प्रकार घडला नाही. ज्वाला धोटे यांनी मी गेल्यानंतर माझ्या साहित्याची नासधूस केली आहे. माझा एन्काऊंटर करण्याची धमकी दिली आहे. ही जागा माझी आहे, मी ताबा घेऊन जागेवर कंपाऊंड करत होतो. ती संरक्षण जाळीची नासधूस करण्यात आली. त्यामुळे माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. सर्व प्रकारच्या चौकशीसाठी आपण तयार असल्याचे भाजपचे सुमित बाजोरिया यांनी सांगितले. हेही वाचा - भाजप-शिवसेनेतील मतभेद कोणत्याही क्षणी दूर होऊ शकतात - प्रवीण तोगडिया