यवतमाळ - २०२० हे वर्ष कोरोना वर्ष म्हणुन कायम स्मरणात राहणार आहे. यानंतर येणारे २०२१ हे कोरोनामुक्त वर्ष असावे, यासाठी सर्वांनी एकत्रीत प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी कोरोना कायमचा जावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ३१ डीसेंबरला सेलीब्रेशन टाळावे. असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी केले.
डॉ. दिलीप भुजबळ, जिल्हा पोलीस अधीक्षक कोरोना अद्याप संपला नाही-कोरोनाने संपुर्ण देशाला संकटात टाकले. या संकटाचा सामना आपल्या देशात, राज्यात आणि जिल्ह्यात समाजातील विविध घटकांनी एकत्रीत येऊन केला. आपण दाखविलेल्या या धैर्याचे संपुर्ण जगात कौतुक करण्यात आले. मात्र आता २०२० प्रमाणे येणारे २०२१ हे वर्ष देखील कोरोनाच्या संकटात जावू नये, अशी सर्वांची इच्छा आहे. मात्र त्यासाठी सर्वांना मिळून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे त्याच्या विरुद्धची लढाईही अद्याप संपलेली नाही. ही बाब पाहता तसुभरही ढिलाई न देता सर्व नियमांचे तंतोतंत पालन होणे गरजेचे आहे.
पार्टी, मेजवानी, समारंभ टाळा-अणेक ठिकाणी पार्टी, मेजवाणी आणि इतर समारंभ आयोजीत करण्यात येतात. त्याचा उत्साह रात्री उशीरापर्यंत सुरू असतो. मात्र यंदा परिस्थिती फार वेगळी आहे. या परिस्थितीची जाणीव सर्वांनी ठेवावी आणि मोठ्या प्रमाणात होणारे एकत्रीकरण यंदा रद्द करावे. पार्टी, मेजवाणीचे बेत आखू नये. यंदा घरात राहुन आपल्या परिवारासह मोचक्या लोकांमध्ये नव्या वर्षांचे स्वागत करावे.
प्रतिबंधात्मक कारवाई सुरू-
३१ डीसेंबरच्या पार्श्वभुमीवर पोलीस दलाने कारवाई सुरू केली आहे. त्यात रात्री नाकाबंदी करणे, वाहनांची तपासणी करणे, मद्य प्राशन करुन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करणे, प्रतिबंधात्मक कारवाई करणे आणि कोंबिंग ऑपरेशन राबविणे या कारवाई सुरू झाल्या आहेत. त्यासोबतच अवैध मद्यविक्री आणि शेजारी असलेल्या जिल्ह्यांमध्ये होणारी दारुची तस्करी रोखण्यासाठीही उपाययोजणा करण्यात येत आहे.
हेही वाचा- सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा ४ मे पासून होणार, शिक्षणमंत्र्यांची घोषणा