यवतमाळ - कोरोनाचा उद्रेक पाहता खबरदारी म्हणून, जिल्ह्यामध्ये कलम 144 जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. नगरपालिकेजवळ असलेल्या भागातील रेस्टॉरंटच्या, बार, खानावळ, हॉटेल यांची बंद करण्याची वेळ कमी करण्यात आलू असून, रात्री आठ वाजेपर्यंतच चालू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांनी दिले आहेत.
हेही वाचा - कोरोना : निर्यात ठप्प झाल्याने दररोज १५ हजार क्विंटल केळी पडून
रात्री 8 वाजल्यानंतर कुठलेही हॉटेल व बार चालू ठेऊ नये, असे आदेश असताना अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने दुकाने सुरू होते. त्यामुळे पोलिसांनी गस्त घालून नागरिकांना घरी जाण्याचे आवाहन केले. शिवाय दुकाने बंद करण्याचे आवाहन त्यांनी केले. या मोहिमेमुळे शहरात संचारबंदी सारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.