यवतमाळ - यवतमाळ जिल्हा खेळाडूंची खाण आहे. या जिल्ह्याने राज्याला प्रत्येक क्षेत्रात नामवंत खेळाडू दिले आहेत. स्केटींग स्पर्धेत शेतकरी कन्या असलेल्या अनुष्का गजानन कोरपकवार हिने ( Anushka won a gold medal in the National Skating Championship Jaipur ) जयपूर येथे झालेल्या नॅशनल स्तरावरील ( National Skating Championship ) स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले आहे. यापूर्वी पुणे येथे पार पडलेल्या नॅशनल स्तरावरील स्पर्धेत तिने सिल्वर पदक प्राप्त केले होते. या यशामुळे यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अनुष्काचे यश प्रेरणादायी ठरणारे आहे.
यवतमाळमधील शेतकरी कन्या अनुष्काचे राष्ट्रीय स्पर्धेत यश अनुष्काचे वडील शेतकरी आहेत. तर आई कुटुंबाला हातभार लागावा म्हणून एका बँकेत नोकरी करते. मुलीने शिक्षणासोबत खेळाची आवड जोपासावी, यासाठी घरातून प्रोत्साहन दिले. या लेकीनेही राज्यभरात झालेल्या विविध प्रकारच्या स्पर्धेत सहभागी होऊन पालकांचा विश्वास सार्थ ठरवला. स्केटिंगमध्ये मुलांचा बोलबाला आहे. मात्र, अभ्यासासोबत सायंकाळी नियमित एक तास अभ्यास करून अनुष्काने नॅशनल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. विशेष म्हणजे तिच्या कुटुंबात आणि जिल्ह्याला सुवर्ण पदक मिळूवन खेळात भरारी घेणारी पहिलीच खेळाडू असल्याचा अभिमान पालकांना आहे. तिने यशोशिखरावर गाठत ऑलिंपिक स्पर्धेत देशाचे नेतृत्व करावे, असे पालकांचे प्रयत्न आहे. शेतकरी कन्या असलेल्या अनुष्का कोरपकवार हिचे यश ग्रामीण व सोयीसुविधांचा अभाव असलेल्या खेळाडूंना प्रेरणा देणारे आहे. स्केटिंग हा चपळतेने व कौशल्यपूर्ण खेळला जातो. शरीराची लवचिकता वाढविणारा हा खेळ आहे.
हेही वाचा - Retreat Ceremony Stopped : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटारी सीमेवर नागरिकांना बंदी