यवतमाळ - गत काही दिवसांपासून संस्थात्मक विलगीकरणात भरती असलेल्या सात जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर पुन्हा एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आता पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या एकूण 14 वर पोहचली आहे. आज रिपोर्ट प्राप्त झालेल्या 8 पॉझिटिव्ह जणांच्या थेट संपर्कात आलेल्या 102 लोकांना प्रशासनाने ताब्यात घेतले असून, त्यांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिंह यांनी दिली.
जिल्ह्यातील सहा प्रतिबंधित क्षेत्रापैकी एकाच भागातून हे पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने या भागाच्या सीमाबंदीचा परीघ आता वाढविण्यात येणार आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने संपूर्ण यवतमाळ शहर शनिवार, रविवार आणि सोमवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. जिल्ह्यात इतरत्र मात्र मर्यादीत वेळेनुसारच दुकाने सुरू राहतील, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या भागाला सील करण्यात आले आहे. तरीदेखील पॉझिटिव्ह रिपोर्ट येत असल्याने चिंता वाढली आहे.
संस्थात्मक विलागिकरणात गत काही दिवसांपासून भरती असलेल्या सात जणानंतर
पॉझिटिव्हसह एकूण 25 जण रुग्णालयात भरती आहेत. गत 24 तासात यात 11 जणांची भर पडली. जिल्ह्यात 150 जण संस्थात्मक विलगीकरणात तर 794 जण गृह विलगीकरणात आहेत. सद्यस्थितीत 32 अहवाल अप्राप्त असल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे.