यवतमाळ घरकुल house मिळण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेल्या महिलेने यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आत्मदाहनाचा self immolation प्रयत्न केला. शहर पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या सातर्कतेने आत्मदाहना च प्रयत्न फसला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
हेही वाचा Independence Day स्वातंत्र्यदिनी रॅली काढत दावते इस्लामिक हिंद संघटनेचा १ कोटी झाडे लावण्याचा संकल्प
घटनेने एकच खळबळ शांता बनसोड, असे महिलेचे नाव असून, महिला यवतमाळ तालुक्यातील वाई येथील रहिवासी आहे. घरकुल मिळावे यासाठी महिला ग्रामपंचायतकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र, सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी तिच्या सोबत पेट्रोल होते. महिला आत्मदहन करणार असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात येताच ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सगळीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव Amrit Mahotsav of Freedom साजरा केला जात असताना, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा Independence Day सातार्यातील येणके गावात 75 विधवांच्या हस्ते ऐतिहासिक ध्वजारोहण