यवतमाळ - मुंबईवरून यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे लग्नासाठी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला ट्रकने धडक दिली. या अपघातात नववधूसह 13 जण जखमी झाले आहेत. अपघाताची घटना पांढरकवडा बायपासवरील चौपाल सागरपुढे घडली
उपचार घेऊन वणीकडे रवाना -
मुंबईवरून वणी येथे लग्न कार्यासाठी (एमएच 04 जीपी1869) हि ट्रॅव्हल्स जात होती. दरम्यान यवतमाळ येथील यवतमाळ-पांढरकवडा मार्गावर असलेल्या चौपाल सागरपुढे विरूध्द दिशेने भरधाव येनाऱ्या ट्रकने (एमएच 12 एचडी 3401) ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रवास करत असलेल्या नववधूसह 13 जण जखमी झाले. ट्रॅव्हल्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेनंतर महामार्ग पोलीस तसेच उपस्थित नागरीकांनी अपघातग्रस्तांना वसंतराव नाईक शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर जखमींना वणी येथे लग्नप्रसंगासाठी रवाना करण्यात आले.
लग्न कार्यासाठी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला अपघात;नववधूसह 13 जण जखमी - यवतमाळ पोलीस बातमी
यवतमाळ जिल्हातील वणी येथे लग्नासाठी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला अपघात झाला. या अपघातात नववधूसह 13 जण जखमी झाले.