ETV Bharat / state

यवतमाळमध्ये सोयाबीन कापणीला वेग; यांत्रिकी पद्धतीवर शेतकऱ्यांचा भर

author img

By

Published : Oct 27, 2020, 3:15 PM IST

Updated : Oct 27, 2020, 3:28 PM IST

शेतकऱ्यांसाठी सोयाबीनचे हे पीक नगदी पीक समजले जाते. यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनच्या काढणीला आता वेग पकडू लागला आहे.

soybean harvesting in Yavatmal
यवतमाळमध्ये सोयाबीन कापणीला वेग

यवतमाळ - शेतकऱ्यांसाठी सोयाबीनचे हे पीक नगदी पीक समजले जाते. यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनच्या काढणीला आता वेग पकडू लागला आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन कापणी लांबली. यावर्षी मजुरांची टंचाई व वाढते दर यामुळे शेतकऱ्यांनी यांत्रिकी कापणीवर भर दिला आहे.

यवतमाळमध्ये सोयाबीन कापणीला वेग

अनेक मोठे शेतकरी सोयाबीन काढणी ही हार्वेस्टर माध्यमातून करीत आहेत. मजुरांकडून सोयाबीन पीक काढणीचा खर्च हा एकरी चार हजार रुपये येतो. शिवाय ही वेळखाऊ पद्धत आहे. तर हार्वेस्टरच्या माध्यमातून सोयाबीन काढणीचा खर्च हा केवळ १६०० रुपये एकरी येत आहे. यामुळे शेतकर्‍यांचा वेळ, श्रम व पैसा वाचण्याबरोबरच शेतातील लक्ष्मी काही क्षणातच शेतकर्‍याच्या घरात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हार्वेस्टरने सोयाबीन काढणीला पसंती दिल्याचे दिसून येत आहे.

ग्रामीण भागात पंजाब येथून आलेले हार्वेस्टर -

जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात पंजाब येथून आलेले हार्वेस्टर दिसून येत आहे. एखाद्याच्या शेतात हे हार्वेस्टर आल्यानंतर अनेक लहान मोठे शेतकरी सोयाबीनची काढणी अल्पावधीतच होत आहे. पण या यांत्रिकी पद्धतीने कुठे तरी मजुरांच्या हाताचे काम हिरावल्याचे दिसून येत आहे.

Last Updated : Oct 27, 2020, 3:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.