यवतमाळ - सातव्या वेतन आयोगासाठी आश्रमशाळा शिक्षकांसह कर्मचाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे.
२९ जुलै २०१९च्या शासन निर्णयाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घेऊन सातव्या वेतन आयोगानुसार वेतन अदा करावे, उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यात यावा, थकीत वेतन बिलाला मंजुरी द्यावी, सेवेत बारा वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती लागू करण्यात यावी, वसतिगृह अधीक्षक, कर्मचाऱ्यांना संहितेनुसार आठवडी सुट्टी जाहीर करावी, आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आश्रम शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघाने आंदोलन केले.
यावेळी भूपाल राठोड, जयदीप पवार, नामदेव चव्हाण, प्रमोद मुनेश्वर, गोपाळकृष्ण हिरवे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.