ETV Bharat / state

नेरहून पुण्याकडे कापूस गठाणी घेऊन जाणारा ट्रक उलटला

author img

By

Published : Dec 16, 2020, 3:56 PM IST

Updated : Dec 16, 2020, 4:52 PM IST

नेर येथून पुण्याच्या दिशेने कापूस गठाणी घेऊन जाणारा ट्रक नेर-अमरावती मार्गावरील उत्तरवाढोना गावाजवळ उलटल्याने अपघात झाला. यामुळे सुमारे दीड तास या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

अपघातग्रस्त ट्रक
अपघातग्रस्त ट्रक

यवतमाळ - नेर येथून पुणे येथे कापूस गठाणी घेऊन जाणारा 18 चाकी ट्रक उलटल्याने अपघात झाला आहे. ही घटना उत्तरवाढोना गावाजवळ घडली. यामुळे नेर-अमरावती मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

नेरहून पुण्याकडे कापूस गठाणी घेऊन जाणारा ट्रक उलटला

चारचाकीला वाचविण्याच्या प्रयत्ना उलटला ट्रक

नेर येथील जिनिंगमधून पुणे येथे कापूस गठणी घेऊन जाणाऱ्या ट्रकने (एम एच 26 ए डी 3195) समोरून भरधाव वेगात येणाऱ्या चारचाकीला ट्रक चालकाने जागा दिली. यावेळी चारचाकी चालकाने अचानक ब्रेक दाबले. चारचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटले. यानंतर हा ट्रॅक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला नेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 18 चाकी ट्रक असल्याने या मार्गावरील वाहतूक जवळपास दीड तास ठप्प झाली होती.

हेही वाचा - पंधरा दिवसात भरपाई न दिल्यास पीकविमा कंपनीला घेराव; अन्यथा न्यायालयाचे दार ठोठाऊ

हेही वाचा - विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवर लोकसहभागातून बांधला सेतू

Last Updated : Dec 16, 2020, 4:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.