यवतमाळ- अवघ्या तीन वर्षांची असताना रेल्वेच्या डब्ब्यातून पडून अपघात तिने आपले हात गमावले. पण जर मनात जिद्द, चिकाटी आणि आकांक्षा असेल तर कोणीही आकाशाला गवसणी घालू शकतात. याचाच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे यवतमाळची मोहिनी डगवार. अपघातात तिचे दोन्ही हात गेले पण मोहिनीची इच्छाशक्ती मात्र, डगमगली नाही. अपंगत्वार मात करत कॉम्पुटरमध्ये बीएससी पूर्ण केले. याशिवाय तिने सोबतच चित्रकलेचा छंद जोपासला. रोटरी क्लबच्यावतीने तिने काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाला यवतमाळकर उस्फुर्त प्रतिसाद देत आहे.
अपघातात हात गमावूनही 'ती' बनली सुंदर चित्रकार - mohini dagwar news
मोहिणीच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून यवतमाळ रोटरी क्लबने तिच्या चित्रांचे प्रदर्शन भरविले आहे. तिने काढलेले चित्र पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रसिक भेट देत आहे.