यवतमाळ - पूर्वी जंगलात आढळणाऱ्या बांबूचा सध्या बहुउपयोग होत आहे. जिल्ह्याच्या पांढरकवडा तालुक्यातील मांगुर्डा येथे अजय डोळके यांनी अडीच हेक्टरवर वेगवेगळ्या भागातील 54 वेगवेगळ्या प्रजातीच्या बांबू लागवड केली आहे. शेतकऱ्यांना बांबूपासून 3 ते 4 वर्षानंतर यातून आर्थिक नफा होऊ शकतो. डोंगराळ भागातही त्याची लागवड करता येते. त्यापासून फर्निचर ते हातमागच्या विविध सुबक वस्तू तयार करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी धुऱ्यावर बांबूची लागवड करावी यातून जमिनीची धूप कमी करता येते आणि शेतकऱ्यांना चांगले उत्पन्नही मिळते.
शासनाकडून लागवडीसाठी चालना
गेल्या वर्षी सरकारने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे बांबू उद्योगाला नवी चालना मिळाली आहे. बाजारात बांबूपासून बनलेल्या वस्तू वापरण्याकडे आता कल वाढताना दिसत आहे. बांबूच्या बाटल्या, बांबूचे कप, ताट, चमचे, दागिने, हॅण्डक्राफ्ट यांसारख्या वस्तूंची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांना पैसे कमावण्यासाठी आता या व्यवसायामुळे नवी संधी मिळाली आहे.
बांबूपासून सूप टोपल्याच्या पलीकडेही अनेक उपयोग आहेत. उपयोगीता ठरवून योग्य प्रजातीच्या बांबूची लागवड केल्यास त्यातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळू शकते. बांबू फळपिकांच्या सुरक्षेसाठी उपयोगात येते. जास्त उष्णता असलेल्या भागात लहान पानांच्या बांबू प्रजातीची लागवड केली तर उत्तम आहे, असे अजय यांनी डोळके सांगितले.
हेही वाचा - यवतमाळ काँग्रेसकडून ऑक्सिजन काॅन्संट्रेटरचे वाटप, अंत्यसंस्कार करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार