यवतमाळ - आपल्या प्रियजनांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो लोकांचा सहभाग असलेल्या अंत्ययात्रा या स्मशानभूमीने पाहिल्या आहेत. मात्र आज कोणामुळे परिस्थिती बदलली. रक्ताचे आणि जवळचे नातेवाईकही मृतदेहाला स्पर्श करायला धजावत नाहीत, इतकेच काय तर मोक्षधामातही येण्यास टाळतात. अशा परिस्थितीत नागरपाकिलकेचे चार कर्मचारी हे मृतदेह मोक्षधाममध्ये ॲम्बुलन्समधून उतरवतात. तर धर्माने मुस्लीम असलेले अब्दुल जब्बार अब्दुल सत्तार आणि शेख अहेमद हे दोघे हिंदू विधिनुसार कोणतीही भीती न बाळगता अंत्यसंस्कार करतात.
संवेदना गोठवून टाकणारा क्षण-
मागच्या वर्षांपासून कोरोना काळात झालेल्या 923 मृदेहावर त्यांच्या धर्माच्या विधिनुसार अंत्यसंस्कार करण्याचे काम बजावणारे हे योद्धे आहेत. अब्दुल जब्बार अब्दुल सत्तार, शेख अहमद, शेख अलीम, आरिफ खान आयुष्यभर जात, धर्म करणारा माणूस जेव्हा कलेवर होऊन पडतो, तेव्हा त्यांच्या अंतिम प्रवासाला सहाय्य करणारे हात केवळ माणसाचेच असतात. कोरोनामुळे झालेला मृतकांचा अंतिम संस्कार हा संवेदना गोठवून टाकणारा क्षण आहे. परिस्थिती अशी आली आहे की, आपले सुद्धा मृतदेहाला हात लावू शकत नाही. अशा परिस्थितीत परिवार, कुटुंब, धर्म, समाज बाजूला ठेवून अत्यल्प मेहताण्यावर अंतिम संस्कार करण्यासाठी जीवाची बाजी लावणारे दुर्लक्षित कॉरोना यौद्धे म्हणजेच स्मशानभूमीतील चार कर्मचारी आहेत.
या कर्मचाऱ्यांना एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी केवळ दोनशे रुपये देण्यात येतात, यासंदर्भात प्रशासनाने काहीतरी विचार करावा अशीही मागणी आणि त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
सर्वाधिक वाचल्या गेलेल्या टॉप ५ न्यूज-
'श्रीरामा'च्या अंत्यसंस्काराला 'सलमान'चा पुढाकार, हिंदू व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर सोडला रोजा
अंध आईच्या हातून निसटला मुलगा, पडला रेल्वे ट्रॅकवर, पॉइंटमनने वाचवला जीव
साताऱ्यातील यवतेश्वर घाटात उडी घेऊन १६ वर्षीय युवतीची आत्महत्या, आधारकार्डवरुन पटली ओळख
लॉजमधील हाय-प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, ८ तरुणींसह १० जणांना अटक
नवी मुंबईत दोन भाऊ, बहिणीसह तिघांवर कोयत्याने हल्ला, छेड काढल्याची तक्रार केल्याने केला हल्ला
कोरोना यौद्धे उपेक्षितच-
कोरोना काळात अनेक नागरिकांनी समाजातील विविध घटकांनी संघटनांनी आपल्या परीने योगदान दिले. या काळात केलेल्या कामाची पावती म्हणून शासनाने त्यांना 26 जानेवारी ला प्रमाणपत्र देऊन पाठ थोपटली. यात असेही काही व्यक्ती आहे ज्यांनी फक्त नावापुरतेच काम करून स्वतःची पाठ थोपटून घेतली. मात्र, जिल्हा रुग्णालय, खासगी रुग्णालयातून मृतदेह घेऊन स्मशानातील सरणावर ठेऊन अंत्यसंस्कार करण्याचे हे अत्यंत जोखमीचे आणि खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडविणारे सच्चे कोरोना यौद्धे अद्यापही उपेक्षित असल्याचे दिसून येते.
कोरोना संसर्गाचा धोका पाहता पूर्ण बाधितांचा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनावर जिल्हा प्रशासनाने सोपविली. त्यामुळे कुठल्याही विशेष निधीची व्यवस्था नसताना पालिका प्रशासनातील डॉ. विजय अग्रवाल, अजयसिंह गहरवाल आणि अमोल पाटील यांनी लोकसहभागातून आतापर्यंत 600 पेक्षा अधिक मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पार पडली. हे केवळ शासनाकडून घेत असलेल्या
वेतनाचे कर्तव्य म्हणून नाही तर एक माणुसकी म्हणून अत्यंत चोखपणे पार पाडत आहे.
हेही वाचा - काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण