ETV Bharat / state

गुरूजी... मला का मारलं? चौथीच्या विद्यार्थ्याचे आई-वडिलांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

कोणतेही कारण नसताना मुख्याध्यापक अशोक मोहूर्ले यांनी पाठीवर, कंबरेवर लाथा भुक्क्यांनी मारहाण केली. मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात यावी यासाठी ९ वर्षांचा सुरज आपल्या आई-वडिलांसह बेमुदत उपोषणाला बसला आहे.

author img

By

Published : Mar 7, 2019, 7:58 PM IST

उपोषण

यवतमाळ - घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील जि.प प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीमधील विद्यार्थी सुरज युवराज राठोड याला कोणतेही कारण नसताना मुख्याध्यापक अशोक मोहूर्ले यांनी पाठीवर, कंबरेवर लाथा भुक्क्यांनी मारहाण केली. मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात यावी यासाठी ९ वर्षांचा सुरज आपल्या आई-वडिलांसह बेमुदत उपोषणाला बसला आहे.

विद्यार्थ्याला मारहाण 11

सुरज मागील ११ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या आई-वडिलांसह उपोषणाला बसलाय. सुरज फक्त इतकाच विचारतोय की गुरुजी... मला का मारले? सुरजला झालेली मारहाण ही गंभीर स्वरूपाची असून राजकीय आशीर्वादामुळे मुख्यध्यापकावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप सुरजच्या पालकांनी केला आहे. मुख्याध्यापकांने इतर मुलांनाही, अशा स्वरूपाची मारहाण केल्याची माहिती याप्रसंगी मुलांनी दिली.

बालहक्क संरक्षण कायद्या अंतर्गत बेदम मारहाण करणाऱ्या संबंधित मुख्याध्यापकावर तत्काळ निलंबनाची कारवाई करून त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणे गरजेचे होते. शिक्षण विभागानेही मुख्यध्यापकावर कृपादृष्टी ठेवत थातुरमातूर चौकशीचा फार्स केला. मारहाणीचे प्रकरण अंगलट येणार, असे दिसताच मुख्याध्यापकाने गावातील एका तरुणामार्फत शाळेतील काही विद्यार्थ्यांची जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घालून दिली. आणि मुख्याध्यापक किती चांगले आहेत हे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता शाळेतून यवतमाळ येथे बक्षीस घेण्यासाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले. ही बाब काही विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना सांगितल्याने त्या शिक्षकावर आणि संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही या पालकांतून करण्यात येत आहे. मुख्याध्यापकावर बालहक्क संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी सुरजची आई उषा राठोड आणि वडिलांनी केली आहे.

undefined

Intro:गुरूजी..... मला का मारलं?
नववर्षाच्या बालकाचे आई-वडिलांसह उपोषणBody:यवतमाळ- घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील जि.प प्राथमिक शाळेतील इयत्ता ४ थी मधील विद्यार्थी सुरज युवराज राठोड याला कुुठलेही
कारण नसताना मुख्याध्यापक अशोक मोहूर्ले यांनी पाठीवर, कंबरेवर लाथा भुक्क्यांनी मारहाण केली. मुख्याध्यापक अशोक मोहूरले यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी यासाठी नव वर्षाचा सुरज आपल्या आई-वडिलांसह बेमुदत उपोषणाला बसला आहे. मात्र या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याने या निर्दयी शिक्षकाला प्रशासन पाठीशी घालत आहेत. सुरज फक्त इतकाच विचारतोय की गुरुजी... मला का मारले? याचे उत्तर मागण्यासाठी मागील ११ दिवसांपासून तो जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या आई-वडिलांसह उपोषणाला बसलाय.
सुराजला झालेली मारहाण ही गंभीर स्वरूपाची असून राजकीय आशीर्वादामुळे या मुख्यध्यापकावर कुठलीच कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप मुलाच्या पालकांनी केला. या मुख्याध्यापकांने इतर मुलांनाही अशा स्वरूपाची मारहाण केल्याची माहिती या प्रसंगी मुलानी दिली. या ठिकाणी बालसंरक्षण कायद्या अंतर्गत बेदम मारहान करणाऱ्या संबंधित मुख्यध्यापकावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करून त्याच्या वर फौजदारी गुन्हे दाखल करणे गरजेचे होते. शिक्षण विभाग ही या मुख्यध्यापकावर कृपादृष्टी ठेवत थातुरमातुर चौकशीचा फार्स केला. मारहाणीचे प्रकरण अंगलट येणार कसे दिसतात मुख्याध्यापक यांनी गावातील एका तरुणाच्या मार्फत शाळेतील काही विद्यार्थ्यांची जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घालून दिली. आणि मुख्याध्यापक किती चांगले आहेत हे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. मात्र या विद्यार्थ्यांची संपर्क साधला असता आम्हाला शाळेतून यवतमाळ येथे बक्षीस घेण्यासाठी जात असल्याचे सांगण्यात आले. ही बाब काही विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना सांगितल्याने त्या शिक्षकावरती आणि संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही या पालकांतुन करण्यात येत आहे. मुख्याध्यापकावर
बालहक्क संरक्षक कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करून तात्काळ त्याला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी आई उषा राठोड व वडीलांनी केली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.