ETV Bharat / state

५० लाखांसाठी अपहरण; भाजप पदाधिकाऱ्यासह ६ जणांना ४ दिवसांची पोलीस कोठडी - crime

यवतमाळ येथील एका सायकल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याच्या मुलाचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. या गुन्ह्याचा पोलिसांनी छडा लावला असून ६ जणांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपींसह पोलीस पथक
author img

By

Published : Jul 16, 2019, 9:05 PM IST

यवतमाळ - येथील एका सायकल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याच्या मुलाचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. त्या मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. अवधुतवाडी पोलीस ठाण्याच्या डीबी स्कॉड पथकाने काही तासातच या प्रकरणाचा छडा लावला. याप्रकरणी आज ६ आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर एका आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे.

५० लाखांसाठी अपहरण; भाजप पदाधिकाऱ्यासह ६ जणांना ४ दिवसांची पोलीस कोठडी

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी असलेला शुभम तोलवाणी याच्यावर क्रिकेट सट्ट्यातून मोठे कर्ज झाले. ते चुकविण्यासाठी त्याने हर्षचे अपहरण केल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आली. शुभम टोलवाणी आणि त्याचा मित्र किशन कोटवानी या दोघांनी यासाठी यवतमाळमधील सराईत गुंड निलेश उन्नरकाठ याला सुपारी दिली होती. त्यानुसार निलेशने आपल्या ३ साथीदारांसह अपहरणाचा कट रचला. हर्ष नाचवानी हा शिकवणीहून परत येत असताना रस्ता निर्मनुष्य झाल्याचे पाहून हर्षला चाकूचा धाक दाखवून दुचाकीवर बसून त्याचे अपहरण केले होते.

अपहरण केल्यानंतर हर्षला घेऊन हे दारव्हा रोडवरील इचोरी जंगलात नेले होते. तेथे हर्षला बेल्टने जबर मारहाण करण्यात आली. नंतर त्याचा व्हिडिओ बनविण्यात आला, त्यात हर्षच्या वडिलांकडे ५० लाखांची मागणी करण्यात आली. सायंकाळी ४ वाजता हर्षला घेऊन आरोपी यवतमाळ शहरातील बोरले नगर येथे गेले होते.

घाबरलेल्या हर्षच्या वडिलांनी ताबडतोब पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळे पथके कार्यान्वीत करून तपासाची चक्रे फिरवली. शहरालगतच्या सर्व जंगल परिसरात हर्षचा शोध सुरु केला. त्याचवेळी तांत्रिक तपास पथकाने हर्षचे मोबाईल लोकेशन घेऊन त्याचा छडा लावला. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज लांडगे यांना शुभमवर संशय आला. त्याला पोलीस मुख्यालयात आणून प्रश्नांची सरबत्ती करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तो पोलिसांसोबत राहून तपासाबाबत अपडेट करत होता. त्यानंतर अवधूतवाडी पोलिसांनी हर्षला ठेवण्यात आलेल्या घरातून त्याची सुटका करून आरोपींना ताब्यात घेतले.

यात पोलिसांनी निलेश उन्नरकाट, नितेश राठोड, अरविंद साबळे, सतीश शेलोटकर, शुभम तोलवानी, सुरज उर्फ सपना शुक्ला या ६ जणांना अटक केली असून किशन कोटवानी याचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आनंद वागतकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक परशराम अबोरे, सुरेश मेश्राम, ऋतुराज मेडवे, सलमान शेख, सुधीर पुसदकर, गणेश राठोड यांनी केली.

आरोपी भाजप पदाधिकारी

शुभम तोलवानी हा भाजपच्या युवा मोर्चा आणि आयटी विभागाचा पदाधिकारी आहे. यामुळे भाजप नेत्यांसोबत फोटो काढून सोशल मीडियावर टाकून तो पोलीस अधिकाऱ्याच्या जवळ राहायचा. त्याने याचाच डाव साधून हा गुन्हा केला. क्रिकेटच्या सट्ट्यामध्ये पैसे हारल्याने झालेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी अपहरण करून तात्काळ पैसे कमविण्याच्या नादात हे आरोपीने मोठा गुन्हा केला. त्यांना न्यायालयमध्ये हजर केले असता ६ आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Intro:50 लाखांचे खंडणी प्रकरण; अपहरणकर्त्या सहा आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी;अद्याप एक आरोपी फरारBody:यवतमाळ : 50 लाखाच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या व्यापाऱ्याच्या मुलाची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली. अवधुतवाडी पोलीस ठाण्याच्या डीबी स्कॉड पथकाने अवघ्या काही तासात या प्रकरणाचा छडा लावन्यात यश आले.
या प्रकरणी सहा आरोपिणा न्यायालयात आज हजर केले असता त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर एक फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे.
यवतमाळ येथील सायकल विक्रेत्याच्या मुलाचे अपहरण करून 50 लाखाच्या खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीचा अखेर अवधुतवाडी पोलीस ठाण्याच्या डीबी स्कॉडनं अवघ्या काही तासात छडा लावला होता. या प्रकरणी काल रात्रीच्या सुमारास 6 जणांना अटक करण्यात आली होती.
या प्रकरणात अपहृत मुलाच्या फिर्यादी वडिलांसोबत सतत पोलिसांपुढे राहणार शुभम तोलवाणी (भाजयुमो पदाधिकारी) नामक युवकच या अपहरण कांडचा सूत्रधार निघाला. टोलवाणी याच्यावर क्रिकेट सट्ट्यातून मोठे कर्ज झाले. ते चुकविण्यासाठी त्याने हर्षचे अपहरण केले असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
शुभम टोलवाणी आणि त्याचा मित्र किशन कोटवानी या दोघांनी यासाठी यवतमाळमधील सराईत गुंड निलेश उन्नरकाठ याला सुपारी दिली. त्यानुसार निलेशने आपल्या ३ साथीदारांसह अपहरणाचा कट रचला आणि हर्ष नाचवानी शिकवणी वरून परत येत असताना रस्ता निर्मनुष्य झाल्याचे पाहून हर्षला चाकूचा धाक दाखून दुचाकी वर बसून त्याचे अपहरण केले होते.
अपहरण केल्या नंतर हर्षला घेऊन हे दारव्हा रोडवरील इचोरी जंगलात नेले होते. तेथे हर्षला बेल्टने जबर मारहाण करण्यात आली. नंतर त्याचा व्हीडिओ बनविण्यात आला, त्यात हर्षच्या वडिलांकडे 50 लाखांची मागणी करण्यात आली. सायंकाळी चार वाजता हर्षला घेऊन आरोपी यवतमाळ शहरातील बोरले नगर येथे आनले होते.
घाबरलेल्या हर्ष च्या वडिलांनी ताबडतोब पोलिसात धाव घेतली आणि त्या नंतर पोलिसांनी वेगवेगळे पथके कार्यन्वित करून तपासाची चक्रे फिरवली. शहरा लगतच्या सर्व जंगल परिसरात हर्षचा शोध सुरु केला त्याच वेळी तांत्रिक तपास पथकाने हर्षचे मोबाईल लोकेशन घेऊन त्याचा छडा लावला. त्याच दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज लांडगे यांना शुभमवर संशय आला. त्याला पोलीस मुख्यालयात आणून प्रश्नांची सरबत्ती करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तो पोलिसांसोबत राहून तपासाबाबत अपडेट करीत होता. त्या नंतर अवधूत वाडी पोलिसांनी हर्षला ठेवण्यात आलेल्या घरातून त्याची सुटका करून आरोपीताना ताब्यात घेतले. आणि पोलिसांनी अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा छडा लावला. यात पोलिसांनी निलेश उन्नरकाट, नितेश राठोड, अरविंद साबळे, सतीश शेलोटकर, शुभम तोलवानी, सुरज उर्फ सपना शुक्ला या ६ जणांना अटक केली असून किशन कोटवानी हा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अप्पर पोलिस अधीक्षक अमरसिंह जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आनंद वागतकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक परशराम अबोरे, सुरेश मेश्राम, ऋतुराज मेडवे, सलमान शेख, सुधीर पुसदकर, गणेश राठोड यांनी केली.Conclusion:भाजपच्या नेत्यांसोबत जवळचे समंध
शुभम तोलवानी हा भाजपच्या युवा आणि आयटी विभागाचा पदाधिकारी असून त्याचे पक्षातील आणि जिल्ह्यातील अनेक नेत्यांसोबत परिचयाचे सम्बन्ध आहे. नेत्यांसोबत फोटो काढून सोशल मीडियावर टाकून तो पोलीस अधिकाऱ्याच्या जवळ राहायचा. त्याने याचाच डाव साधून हा गुन्हा केला. क्रिकेटच्या सटामध्ये पैसे हरल्याने झालेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी अपहरण करून तात्काळ पैसे कमविण्याच्या नादात हे आरोपी मोठा गुन्हा करून बसले. आज त्यांना न्यायालय मध्ये हजर केले असता सहा आरोपिणा चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

बाइट- अप्पर पोलिस अधीक्षक अमरसिंह जाधव
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.