ETV Bharat / state

यवतमाळ जिल्ह्यात 556 नवे कोरोना पॉझिटिव्ह, 10 रुग्णांचा मृत्यू

मागील 24 तासात यवतमाळ जिल्ह्यात 10 मृत्यूसह 556 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 286 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

corona positive patient found in yavatmal

author img

By

Published : Mar 23, 2021, 10:04 PM IST

यवतमाळ - मागील 24 तासात जिल्ह्यात 10 मृत्यूसह 556 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 286 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

आज 5,404 रिपोर्ट प्राप्त -

मृत झालेल्या व्यक्तींमध्ये यवतमाळ येथील 75, 78, 62, 71 वर्षीय पुरुष आणि 60, 65 वर्षीय महिला, बाभुळगाव तालुक्यातील 50 वर्षीय महिला, दिग्रस येथील 52 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 62 वर्षीय पुरुष आणि मानोरा (जि. वाशिम) येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच आज (दि.23) पॉजिटिव आलेल्या 556 जणांमध्ये 393 पुरुष आणि 163 महिला आहेत. यात यवतमाळातील 234, राळेगाव 59, दारव्हा 53, उमरखेड 40, दिग्रस 39, पांढरकवडा 39, पुसद 29, कळंब 23, नेर 13, वणी 6, बाभुळगाव 6, घाटंजी 5, आर्णि 3, मारेगाव 2, झरीजामणी 2 आणि 3 इतर शहरातील रुग्ण आहे. मंगळवारी एकूण 5404 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 556 जण नव्याने पॉझिटिव्ह आले तर 4848 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.

जिल्ह्यात 2225 ॲक्टीव्ह रुग्ण -

सद्यस्थितीत जिल्ह्यात 2225 ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 25,396 झाली आहे. 24 तासात 286 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 22,588 आहे. तर जिल्ह्यात एकूण 583 मृत्यूची नोंद आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत 2,39703 नमुने पाठविले असून यापैकी 2,28470 प्राप्त तर 11233 अप्राप्त आहेत. तसेच 2,03074 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.