ETV Bharat / state

यवतमाळमध्ये ५० कोरोना पॉझिटिव्ह; आज 9 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ - yavatmal corona news

आयसोलेशन वॉर्डमध्ये 298 जण भरती आहेत, रविवारी एकूण 39 जण नव्याने आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करण्यात आले आहेत. नागपूर येथे तपासणीकरिता आज 64 नमुने पाठविले आहेत. सद्यस्थितीत 264 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. संस्थात्मक विलगीकरणात 166 जण तर गृह विलगीकरणात एकूण 829 जण आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली.

यवतमाळमध्ये ५० कोरोना पॉझिटिव्ह; आज 9 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

author img

By

Published : Apr 26, 2020, 8:30 PM IST

Updated : Apr 26, 2020, 11:31 PM IST

यवतमाळ - शहरात सकाळी 7 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर दुपारी पुन्हा 9 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे यवतमाळ शहरात एकूण पॉझिटिव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 50 झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. पूर्णपणे सीलबंद करण्यात आलेल्या भागात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. या भागातील 14 हँडपम्पसुद्धा काढण्यात आले आहेत. आयसोलेशन वॉर्डमध्ये 298 जण भरती आहेत, रविवारी एकूण 39 जण नव्याने आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करण्यात आले आहेत. नागपूर येथे तपासणीकरिता आज 64 नमुने पाठविले आहेत. सद्यस्थितीत 264 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. संस्थात्मक विलगीकरणात 166 जण तर गृह विलगीकरणात एकूण 829 जण आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली.

यवतमाळमध्ये ५० कोरोना पॉझिटिव्ह; आज 9 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

साधारण यवतमाळच्या इंदिरानगर, पवारपुरा, मेमन नगर या भागात काही पॉझिटिव्ह रुग्णांचे वास्तव्य होते. त्यांच्या संपर्कात काही नागरिक आणि काही कुटुंबीय आले. त्यामुळे ही पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढली आहे. आता जिल्हा प्रशासनाने या भागातील याच भागात जिल्ह्याच्या प्रमुख अधिकारी आरोग्य अधिकारी या सर्वांची बैठक बोलावली. पुढील उपाययोजनांबाबत नियोजन करण्यात येत आहे.

दरम्यान, सध्या यवतमाळमध्ये 50 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून 10 लोकांना आतापर्यंत सुटी झाली आहे. साधारण 300 लोकांना इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन करून ठेवले आहे. सद्यस्थितीत 264 नमुन्यांचे रिपोर्ट अप्राप्त आहेत. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, नागरिकांनी घराच्या बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले आहे.

Last Updated : Apr 26, 2020, 11:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.