ETV Bharat / state

यवतमाळमधील 47 गावांना सतर्कतेचा इशारा; पावसाने उमरखेडमधील 98 घरांची पडझड - विदर्भ

जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. पुसद, बिटरगाव, खरुज, मुळावा या गावांना जाणारे प्रमुख मार्ग पाण्यामुळे बंद झाले होते. तर, पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

47 villages have been given warning amid heavy rain in yavatmal 98 houses have fell down till now due to rain
author img

By

Published : Aug 5, 2019, 11:50 AM IST

Updated : Aug 5, 2019, 12:03 PM IST

यवतमाळ - राज्यात मागील आठ दिवसांपासून कुठे मुसळधार, तर कुठे रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे, विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा नदी काठावरील 47 गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. तसेच वर्धा नदीवरील बाभुळगाव, कळंब आणि राळेगाव या तीन तालुक्यांतील नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे उमरखेड तालुक्यातील 98 घरांची पडझड झाली आहे. तर, यवतमाळ तालुक्यात बेचखेडा येथील दोन घरांची पडझड झाली आहे.

यवतमाळमधील 47 गावांना सतर्कतेचा इशारा; पावसाने उमरखेडमधील 98 घरांची पडझड

जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. पुसद, बिटरगाव, खरुज, मुळावा या गावांना जाणारे प्रमुख मार्ग पाण्यामुळे बंद झाले होते. सततच्या पावसामुळे विहिरी, हातपंप व प्रकल्पांतील जलसाठ्याच्या पातळीत वाढ झाली आहे. तर, पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी 410 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामध्ये उमरखेड येथे 73 मिलीमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल पुसद (45 मिमी) , दिग्रस (42 मिमी) , महागाव (26 मिमी) , वणी (26 मिमी), कळंब (24 मिमी), मारेगाव (23 मिमी), आर्णी (22 मिमी), बाभूळगाव (20 मिमी), केळापूर (18 मिमी), राळेगाव (18 मिमी), यवतमाळ (16 मिमी), घाटंजी (15 मिमी), झरीजामणी (13 मिमी), दारव्हा (13 मिमी) आणि नेर तालुक्यात 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

Intro:Body:यवतमाळ : मागील आठ दिवसापासून कुठे मुसळधार तर कुठे रिमझिम पडत आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा नदी नदी काठावरील 47 गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. तसेच वर्धा नदीवरील बाभुळगाव कळम राळेगाव या तीन तालुक्यातील नदीकाठावरील गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. या पावसामुळे उमरखेड तालुक्यातील 98 घराची पडझड झाली आहेत तर यवतमाळ तालुक्यात बेचखेडा येथील दोन घरांची पडझड झाली आहे

जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. पुसद बिटरगाव खरुज मुळावा या गावांना जाणारे प्रमुख मार्ग पाण्यामुळे बंद झाले होते. उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील गावातील 98 घरांची पडझड झाल्याचीही माहिती प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. सततच्या पावसामुळे विहिरी, हातपंप व प्रकल्पातील जलसाठ्याच्या पातळीत वाढ झाली आहे. तर परिसरातील या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती जलमय झाली आहेत. या पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील गावांमध्ये पावसाचे पाणी घरात शिरले आहेत.
जिल्ह्यात दोन दिवसपूर्वी 410 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यामध्ये उमरखेड येथे 73 मिलीमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल पुसद45, दिग्रस 42, महागाव 26, वणी 26, कळंब 24, मारेगाव 23, आर्णी 22, बाभूळगाव 20, केळापूर 18, राळेगाव18, यवतमाळ 16, घाटंजी 15, झरीजामणी 13, दारव्हा 13 आणि नेर तालुक्यात 10 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.Conclusion:
Last Updated : Aug 5, 2019, 12:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.