ETV Bharat / state

बोरी बुद्रुक येथे शेतकऱ्याच्या गोडाऊनमधून ३६ पोते सोयाबीनची चोरी; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद - Ashwin Deshpande Soybean steal Bori Budruk

घटनेची माहिती कळताच दारव्हा पोलिसांनी घटनास्थळ गाठून श्वान पथकाला आणि ठसे तज्ञांना पाचारण केले आणि पंचनामा केला. श्वानपथक गोडाऊन परिसरात गुटमळत असल्याने चोरट्याबाबत ठोस पुरवा पोलिसांना मिळाला नाही.

yavatmal
सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले चोरीच्या घटनेचे दृश्य
author img

By

Published : Jan 6, 2020, 11:54 PM IST

यवतमाळ- बोरी बुद्रुक येथील एका शेतकऱ्याच्या गोडाऊनमधून चोरट्यांनी ३६ पोते सोयाबीन चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले चोरीच्या घटनेचे दृश्य

दारव्हा पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या बोरी बुद्रुक येथील शेतकरी अश्विन देशपांडे यांच्या मालकीच्या गोडाऊनमध्ये सोयाबीन साठवून ठेवलेली होती. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास गोडाऊनचे कुलूप तोडून गोडाऊनमधील ३६ पोते सोयाबीन चोरून चारचाकी वाहनातून पळ काढला. सकाळी गोडाऊन फोडून असल्याचे देशपांडे यांच्या निदर्शनास आले. त्यानी तात्काळ सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक केले. त्यात हातात रॉड घेऊन चोरटे चोरी करत असतानाचे दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते.

या घटनेची माहिती कळताच दारव्हा पोलिसांनी घटनास्थळ गाठून श्वान पथकाला आणि ठसे तज्ञांना पाचारण केले आणि पंचनामा केला. श्वानपथक गोडाऊन परिसरात गुटमळत असल्याने चोरट्यांबाबत ठोस पुरावा पोलिसांना मिळाला नाही. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा- 'शेतकऱ्यांना कर्ज माफीचा दिलासा मिळणारच'

Intro:Body:यवतमाळ : दारव्हा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरी बुद्रुक येथील शेतकरी अश्विन देशपांडे यांच्या मालकीच्या गोडाऊन मध्ये सोयाबीन साठवून ठेवले होते.
अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या दरम्यान गोडाऊनचे कुलूप तोडून गोडाऊन मधील 36 पोते सोयाबीन चोरून चारचाकी वाहनातुन पळ काढला. सकाळी गोडाऊन फोडून असल्याचे देशपांडे यांना निदर्शनास आले त्यानी तात्काळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात फुटेज चेक केले. त्यात
हातात रॉड घेऊन चोरटे चोरी करत असताना कॅमेरा मध्ये कैद झाले आहे.

या घटनेची माहिती कळताच दारव्हा पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून श्वान पथकाला आणि ठसे तज्ञांना पाचारण करून पंचनामा केला. श्वानपथक गोडाऊन परिसरात गुटमळत असल्याने चोरट्यांन बाबत ठोस पूरवा पोलिसांना मिळाला नाही.या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या चोरट्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांन पुढे आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.