ETV Bharat / state

कोरोनाची लस विकसित करण्यासाठी 30 माकडांवर होणार प्रयोग - वनमंत्री संजय राठोड

सध्या राज्यात कोरोना विषाणूमुळे होत असलेला प्रादुर्भाव व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकल्पास तातडीने परवानगी देण्याबाबत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी 30 मे 2020 रोजीच्या पत्रान्वये शासनास मान्यता देण्याची शिफारस केली आहे.

Corona vaccine trial, forrest minister Sanjay rathod
Sanjay rathod
author img

By

Published : Jun 6, 2020, 9:24 PM IST

यवतमाळ - कोरोना विषाणूमुळे होत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी सार्सकोव्ह- 2 ही लस तात्काळ विकसित करण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आले आहे. या संशोधन प्रकल्पासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेला 30 माकडांची आवश्यकता आहे. ही 30 माकडे राज्याच्या हद्दीतून देण्यात येणार असून कोरोना प्रतिबंधात्मक लसचा सर्वप्रथम प्रयोग या माकडांवर करण्यात येईल.

सध्या राज्यात कोरोना विषाणूमुळे होत असलेला प्रादुर्भाव व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकल्पास तातडीने परवानगी देण्याबाबत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी 30 मे 2020 रोजीच्या पत्रान्वये शासनास मान्यता देण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार ही माकडे तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले आहे.

याप्रकरणी अनुभवी मनुष्यबळामार्फत माकडांना पकडणे, त्यांना कुशलतेने हाताळणे, त्यांना सुरक्षितपणे बाळगणे, पकडलेल्या माकडांना तसेच परिसरातील इतर वन्यप्राण्यांना जखमी तसेच त्यांचा दैनंदिन जीवनक्रम विस्कळित न होऊ देणे, प्रकल्पाचा व्यापारी तत्वावर उपयोग न करणे आदी अटी शर्तींच्या अधीन राहून ही मान्यता देण्यात आली असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.