ETV Bharat / state

यवतमाळ : शनिवारी 233 कोरोनाबाधितांची नोंद तर दोन जणांचा मृत्यु

सद्यस्थितीत जिल्ह्यात 1502 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 17 हजार 330 झाली आहे.

yawatmal corona
यवतमाळ कोरोना
author img

By

Published : Feb 27, 2021, 7:32 PM IST

यवतमाळ - मागील 24 तासांत जिल्ह्यात दोन मृत्युसह 233 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हिड केअर सेंटर आणि कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 156 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मृतांमध्ये पांढरकवडा तालुक्यातील 68 वर्षीय आणि दिग्रस येथील 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

1681 अहवाल प्राप्त -

पॉझिटिव्ह आलेल्या 233 जणांमध्ये 139 पुरुष आणि 94 महिला आहेत. यात यवतमाळातील 90 रुग्ण, पुसद येथील 8, दिग्रस 36, पांढरकवडा 19, वणी 16, दारव्हा 13, बाभूलगांव 21, घाटंजी 3, कळंब 8, महागाव 4, उमरखेड़ 5, नेर 5, मारेगाव 2 आणि 3 इतर रुग्ण आहेत. एकूण 1681 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 233 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तर 1448 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.

हेही वाचा - Corona Bulletin : राज्यातील कोरोना संदर्भातील घडामोडींचा वेगवान आढावा

1502 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह -

सद्यस्थितीत जिल्ह्यात 1502 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 17 हजार 330 झाली आहे. 24 तासांत 156 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 15 हजार 369 आहे. तर जिल्ह्यात एकूण 459 मृत्युची नोंद आहे. दरम्यान, सुरुवातीपासून आतापर्यंत 1 लाख 61 हजार 571 नमुने पाठविले आहेत. यापैकी, 1 लाख 60 हजार 5 नुमने प्राप्त तर 1566 अप्राप्त आहेत. तसेच 1 लाख 42 हजार 675 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.