यवतमाळ - आदिवासी समाजासाठी पुसदमधील वडते मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे कोरोना रुग्णांसाठी नि:शुल्क 20 बेडचे आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले आहे. भारतीय जनता पक्ष अनुसूचित जमातीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांच्या प्रयत्नातून हे आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले आहे.
24 तास वैद्यकीय सेवा -
पहिल्या व दुसर्या लाटेनंतर कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अनुषंगाने तालुक्यातील आदिवासी समाजातील रुग्णांकरिता या कोविड आयसोलेशन सेंटरमध्ये निःशुल्क 20 बेड सर्व सुविधांसह उभारण्यात आले आहेत. तसेच या आयसोलेशन सेंटरमध्ये 24 तास वैद्यकीय सेवा, दोन वेळ पौष्टिक आहारयुक्त जेवण व नाश्ता, डॉक्टरांचे मार्गदर्शन, मनोरंजनासाठी टी.व्ही. या सुविधांची सोय करण्यात आली आहे.
हेही वाचा - बुलडाण्यात ओशाळली माणुसकी! बिलाच्या पैशांसाठी रुग्णालयाने ठेऊन घेतले मंगळसूत्र!
या सेंटरचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा प्रांत संचालक डॉ. पंकज जयस्वाल यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री व अनुसूचित जमाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार प्रा. अशोक उईके होते. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, आमदार अॅड. निलय नाईक, पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, उमरखेडचे आमदार नामदेव ससाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा - 'लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका'