यवतमाळ - जिल्ह्यात मागील २४ तासांमध्ये आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्याने 194 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आज मृत झालेल्या आठ जणांमध्ये यवतमाळ शहरातील 70 वर्षीय पुरुष आणि 58 वर्षीय महिला, पुसद येथील 64 वर्षीय पुरुष, महागाव शहरातील 30 वर्षीय पुरुष, बाभूळगाव शहरातील 65 वर्षीय पुरुष, राळेगाव शहरातील 63 वर्षीय पुरुष, आर्णी तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष आणि वणी शहरातील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
आज नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 194 जणांमध्ये 127 पुरुष व 67 महिला यांचा समावेश आहे. मागील दोन दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांचा व मृत्यूचा आकडा घटला होता. मात्र ती आज अचानक वाढली असून एकाच दिवशी 8 जणांना मृत्यू आणि दोनशेच्या जवळपास पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुन्हा गावामध्ये तपासणी वाढवली आहे. सद्यस्थितीत होम आयसोलेशन 550 जण तर आयसोलेशन वॉर्डात 275 जण आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8470 झाली. तर यातील 6966 जण बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 262 कोरोनाबधितांचा मृत्यू झाला आहेत. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.