यवतमाळ - गेल्या 24 तासांमध्ये यवतमाळ जिल्ह्यात 1 हजार 399 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर 1 हजार 161 जणांनी कोरोनावर मत केली आहे. कोरोनामुळे गेल्या 24 तासांमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांपैकी तीन जण हे जिल्ह्याबाहेरील आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 21 जणांचा मृत्यू झाला असून, कोविड हेल्थ सेंटरमध्ये एक तर खासगी रुग्णालयात 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरात 7 हजार 97 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून, यातील 1 हजार 399 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात सध्या 6 हजार 701 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. बाधित रुग्णांपैकी 2 हजार 523 रुग्णांवर रुग्णांलयांमध्ये उपचार सुरू आहेत, तर 4 हजार 178 रुग्ण हे गृह विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत.
कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 56 हजार 159 वर
आज जिल्ह्यात 1 हजार 399 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 56 हजार 159 वर पोहोचला आहे. यातील 48 हजार 104 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर कोरोनामुळे आतापर्यंत 1354 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 6 हजार 701 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - पुण्याच्या आमदाराचे 'हनी ट्रॅप' तरुणीनेच आणले उघडकीस, दोघांवर गुन्हा