यवतमाळ - वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल असलेल्या 11 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून यापैकी दोन जणांना गृह विलगीकरणात तर 9 जणांना संस्थात्मक विलगीकरणात आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डमध्ये 62 जण भरती आहेत. गत 24 तासात 3 जण आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती झाले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाला आज 42 रिपोर्ट्स प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह आहेत, तर नागपूर येथील एम्स लॅब येथे 69 रिपोर्ट्स प्रलंबित आहेत.
शुक्रवारी 38 नमुने तापसणीसाठी नागपूरला पाठवण्यात आले आहेत. गृह विलगीकरणात जवळपास 667 जण आहेत. संस्थात्मक विलगीकरणाअंतर्गत अल्पसंख्यांक मुलींच्या वसतीगृहात 104 जण तर समाजकल्याण विभागाच्या मुलींच्या वसतीगृहात 33 जण आहेत.