यवतमाळ - जिल्ह्यातील किटाकापरा-चोसाळा मार्गावर बस उलटून १० ते १५ प्रवासी जखमी झाले आहे. यामध्ये नागरिकांसोबत शाळकरी मुलांचा समावेश आहे. जखमींना यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज दुपारी राज्य परिवहन महामंडळाची बस प्रवाशी घेऊन जात होती. वळणावर बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे.