वाशिम - 'रोहयो' कामातील भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी न झाल्याने एक युवक आत्महत्या करण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढला आहे. गोपीनाथ नागरे असे या युवकाचे नाव आहे.
गावातील रोजगार हमी योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार गोपीनाथने जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. तसेच या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणाची चौकशी न झाल्यास ३ जूनला आत्मदहन करणार असल्याचा इशारा गोपीनाथने निवेदनाद्वारे दिला होता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत कोणतीही चौकशी केली नाही. त्यामुळे गोपाल आज पहाटेच आत्मदहन करण्यासाठी गावातील पाण्याच्या टाकीवर चढला.
दरम्यान, गोपीनाथ नागरेला खाली उतरविण्यासाठी गावातील लोकांसह त्याची आई आवाज देत आहे. परंतु गोपीनाथ खाली उतरायला तयार नाही.