ETV Bharat / state

रिसोड शहरात चाकूने भोसकून युवकाची हत्या

वैभव नारायण इंगोले आपल्या नातेवाइकांसह क्षुल्लक कारणावरून भांडण करीत होता. सदर भांडण सोडविण्यासाठी संतोष ऊर्फ पिंटू अर्जुनराव जायभाये गेला असता आरोपी वैभव नारायण इंगोले याने अचानक त्याच्या पाठीत चाकू भोसकून त्याला जखमी केले. संतोषचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घटना स्थळी जमलेला जमाव
author img

By

Published : Oct 3, 2019, 8:47 AM IST

वाशिम - रिसोड शहरात घरगुती कारणावरून पाठीत चाकू भोसकून युवकाची हत्या केल्याची थरारक घटना समोर आली आहे. ही घटना शहरातील देशमुख गल्लीत घडली. जखमी युवकाला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतोष ऊर्फ पिंटू अर्जुनराव जायभाये असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

शहरातील देशमुख गल्लीमध्ये राहणाऱ्या रेणुकाबाई अर्जुन जायभाये यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले की, वैभव नारायण इंगोले आपल्या नातेवाइकांसह क्षुल्लक कारणावरून भांडण करीत होता. सदर भांडण सोडविण्यासाठी त्यांचा मुलगा संतोष ऊर्फ पिंटू अर्जुनराव जायभाये गेला असता आरोपी वैभव नारायण इंगोले याने अचानक त्याच्या पाठीत चाकू भोसकून त्याला जखमी केले.

हेही वाचा- वाशिममध्ये शाळकरी विद्यार्थीनीला ट्रकने चिरडल्याने जागीच मृत्यू

जखमी संतोषला प्रथम रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचाराकरिता वाशिम येथे हलविण्यात आले. वाशिममध्ये प्रथमोपचार केल्यानंतर जखमी संतोषला अकोला येथे हलविण्यात आले. मात्र, येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला आरोपीविरुद्ध भादवी कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. संतोषचा मृतदेह रिसोड येथे आणण्यात आला. मात्र मृताच्या मित्रांनी व नातेवाइकांनी मृतदेह घरी नेण्याऐवजी थेट पोलीस ठाण्यात आणला. आरोपीस तत्काळ अटक करा, अन्यथा आम्ही मृतदेह येथून नेणार नाही, असा त्यांचा पवित्रा होता. यावेळी पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी झाली होती. पोलिसांच्या आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

हेही वाचा- धक्कादायक: केळी खाल्ल्याने भावा-बहिणीला विषबाधा; बहिणीचा मृत्यू

Intro:पाठीत चाकू भोसकून युवकाची हत्या

वाशिम : रिसोड शहरातील देशमुख गल्लीत घरगुती कारणावरून पाठीत चाकू भोसकलेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला . याप्रकरणी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती . शहरातील देशमुख गल्लीमध्ये राहणाऱ्या रेणुकाबाई अर्जुन जायभाये यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले , की वैभव नारायण इंगोले आपल्या नातेवाइकांसह क्षुल्लक कारणावरून भांडण करीत होता .

सदर भांडण सोडविण्यासाठी त्यांचा मुलगा संतोष ऊर्फ पिंटू अर्जुनराव जायभाये गेला असता आरोपी वैभव नारायण इंगोले याने अचानक त्याच्या पाठीत चाकू भोसकून जखमी केले . जखमीला प्रथम रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचाराकरिता वाशिम येथे हलविले
होते . येथे प्रथमोपचार केल्यानंतर अकोला येथे हलविण्यात आले उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू झाला . सुरुवातीला आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला होता .मृतकाचा मृतदेह रिसोड येथे आणण्यात आला

मात्र मृतकाच्या मित्रांनी व नातेवाइकां मृतदेह घरी नेण्याऐवजी थेट पोलीस स्टेशनला आणून आरोपीस तत्कान अटक करा , अन्यथा आम्ही मृतदे येथून नेणार नाही असा पवित्र घेतला . यावेळी पोलीस स्टेशन समोर मोठी गर्दी झाली होती पोलिसांच्या आश्वासनानंतर मृतदेह ताब्या घेतला Body:पाठीत चाकू भोसकून युवकाची हत्या Conclusion:पाठीत चाकू भोसकून युवकाची हत्या
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.